'जैश'चा तळ उध्वस्त झाल्याची छायाचित्रे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2019
Total Views |


 

एअर स्ट्राईकद्वारे 'जैश'च्या इमारतीचे नुकसान



नवी दिल्ली : एअर स्ट्राईक केल्यानंतर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारकडे पुरावे मागण्यास सुरुवात केली होती. आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीमाध्यमांनी वृत्तांकन केल्यानंतर विरोधकांनी या प्रश्नी सरकारला लक्ष्य केले होते. मात्र, आता उघड झालेल्या माहितीत दहशतवाद्यांच्या इमारतीचे मोठे नुकसान केल्याचे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी वृत्ताकंन केल्यानुसार दहशतवाद्यांचा तळ पूर्णपणे उध्वस्त झालेला नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, नव्या फोटोजनुसार दहशतवाद्यांच्या इमारतीला जोरदार लक्ष्य केल्याचे दिसत आहे. हवाई हल्ल्यात झालेले नुकसान स्पष्टपणे दिसत आहे.


 
 

गेल्या १२ तासांत तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार, भारताने हवाई हल्ल्याद्वारे दहशतवाद्यांचा खात्मा करत या ठिकाणी हाहाकार माजवला होता. जैश ए मोहम्मदच्या तळांचे पूर्णपणे नुकसान झाल्याचे नव्या छायाचित्रांमध्ये दिसत आहे. इमारतींना मोठे तडे गेले आहेत. हवाई हल्ल्यात संपूर्ण इमारत कोसळत नाही मात्र, मोठे नुकसान पोहोचवते, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे.


 
 

वायुदलाने उध्वस्त केलेल्या इमारतीचे छायाचित्र स्पष्टपणे दिसत आहे. वायुदलाने लक्ष्य अचूक भेदत इमारतीवर मारा केला आहे. यात एकूण चार ठिकाणी हल्ला झाल्याची चिन्हे आहेत. पोखरण येथे वायुदलाने वापरण्यात आलेल्या शस्त्रांचा व्हिडिओही देण्यात आला आहे त्यानुसार, एखादी लक्ष्य भेदल्यास संपूर्ण इमारत कोसळत नाही मात्र, नुकसान मोठे होत असल्याचे दाखवण्यात आले आहे.



काही प्रसारमाध्यमांनी सॅटेलाईट छायाचित्रांद्वारे जैशच्या इमारती तशाच असल्याचे सांगण्यात आले आहे, मात्र, वायुदलाने दिलेल्या स्पष्टीकरणात लक्ष्य भेदून पूर्णपणे उध्वस्त करण्यात आम्हला यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. इमारतीवर दोन हजार स्फोटकांचा मारा करण्यात आला होता. ही क्षेपणास्त्रे पूर्णपणे इमारत उध्वस्त करू शकत नसली तरीही मोठे नुकसान करू शकतात. हा हल्ला इतका मोठा होता कि इमारतीच्या नजीकची झाडेही जळून खाक झाली आहेत.

 

 
 

भारताने एअर स्ट्राईकमध्ये वापरलेली विमाने ही इस्त्रायलने विकसित केली आहेत, तर फ्रान्स बनावटीच्या मिराज २००० या विमानातून हा हल्ला करण्यात आला होता. पुलवामा येथे करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा सुड म्हणून भारतीय वायुदलाने २६ फेब्रुवारी रोजी ही कारवाई केली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@