दिलीप करंबेळकर यांची मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदी फेरनियुक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2019
Total Views |

 


मे.ज. शशिकांत पित्रे, बाळ फोंडके, संजय तांबट, नीरज हातेकर यांचीही सदस्यपदी नियुक्ती



मुंबई : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष तथा दै. ‘मुंबई तरूण भारत’चे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांची पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी फेरनियुक्ती करण्यात आली आहे.

 

दिलीप करंबेळकर हे ऑगस्ट, २०१५ पासून विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारच्या मराठी विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या निर्णयानुसार, मंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून दिलीप करंबेळकर यांची मंडळाच्या अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. यासह मंडळावरील एकूण ३० सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षांसाठी ही नियुक्ती असेल, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळावरील नवनियुक्त सदस्य :

 

१) डॉ. अरूण भोसले, कोल्हापूर, २) डॉ. नागोराव कुंभार, लातूर, ३) डॉ. राजन गवस, कोल्हापूर, ४) डॉ. ऋजुता हादये, मुंबई, ५) संतोष शेलार, नाशिक, ६) मेजर जनरल शशिकांत पित्रे, पुणे, ७) डॉ. अरूणचंद्र पाठक, पुणे, ८) डॉ. भीमराव उल्मेक, पुणे, ९) डॉ. नामदेव मेश्राम, नागपूर, १०) डॉ. शिरीष नखाते, भंडारा, ११) डॉ. संजय तांबट, पुणे, १२) डॉ. बाळ फोंडके, मुंबई, १३) डॉ, नीरज हातेकर, मुंबई, १४) प्रा. लक्ष्मणराव टोपले, पालघर, १५) श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, १६) डॉ. सर्जेराव ठोंबरे, औरंगाबाद, १७) नीलिमा कचे, ठाणे, १८) प्रा. डॉ. सविता लडगे, मुंबई, १९) चारूशिला जुईकर, मुंबई, २०) दिनकर कांबळे, सातारा, २१) सिद्धराम पाटील, सोलापूर, २२) डॉ. अरूणा ढेरे, पुणे, २३) डॉ. श्रीनंद बापट, पुणे, २४) डॉ. दीपक जेवणे, पुणे, २५) माधव चौंडे, सातारा, २६) राहुल देशमुख, मुंबई, २७) डॉ. हेमचंद्र प्रधान, मुंबई, २८) डॉ. गणपत माने, अमरावती, २९) प्रा. अविनाश कोल्हे, मुंबई, ३०) राजेंद्र कोंढरे, पुणे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@