अमेरिकेकडून पाकिस्तानला दणका, व्हिसाच्या कालावधीत केली घट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
न्यूयॉर्क : अमेरिकेने पाकिस्तानला चांगलाच दणका दिला आहे. पाकिस्तानी नागरिकांच्या अमेरिकन व्हिसाच्या कालावधीत अमेरिकेकडून घट करण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांना मिळणाऱ्या व्हिसाचा कालावधी पाच वर्षांवरून कमी करून आता फक्त तीन महिने करण्यात आला आहे. अमेरिकेच्या उच्चायुक्तांलयाच्या प्रवक्त्यांकडून ही माहिती देण्यात आली.
 

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोट येथे एअर स्ट्राईक करून भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर भारतात घुसखोरी करू पाहणाऱ्या पाकिस्तानी विमानांना भारतीय वायुसेनेने परतवून लावले. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय विग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारताने सुखरुप मायदेशी परत आणले.

 

गेले काही दिवस भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. भारताने पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव आणला. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी नागरिकांना आता तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी व्हिसा दिला जाणार नाही. असे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भारताने बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राईकचे डोनाल्ड ट्रम्प यांनी कौतुक केले होते. तसेच दहशतवाद विरोधी कारवाईसाठी अमेरिकेने भारताला पाठिंबा दिला होता.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@