विखे-पाटील यांच्या भाजपप्रवेशाबद्दल दानवेंचे स्पष्टीकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2019
Total Views |
 
 


नगर : राज्याचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशाबद्दलच्या बातम्यांमुळे सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रीया देत विखेपाटील यांना टोला लगावला आहे.

 

दानवे म्हणाले, भाजपप्रवेशाबद्दलच्या बातम्यांद्वारे विखेपाटील  कॉंग्रेस व राष्ट्रवादीमध्ये दबाव निर्माण करू पाहत आहे. भाजपशी त्यांचा कोणताही संपर्क झाला नाही किंवा कोणत्याही भाजप नेत्याने त्यांच्याशी संपर्क केलेला नाही. खा. दानवे हे औरंगाबादहून पुण्याला मंगळवारी निघाले. त्यादरम्यान अहमदनगरला खा.दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

 


रावसाहेब दानवे म्हणाले विखेंचा अद्याप भाजपशी संपर्क झाला नाही. या संबंधीच्या बातम्या ज्या बातम्या आहेत, त्याद्वारे ते कॉंग्रेस व राष्ट्रवादीवर उमेदवारीसाठी दबाव टाकत आहेत, असे दिसते. एकूणच सर्वच पक्षांवर ते उमेदवारीसाठी दबाव आणत असल्याचे खा. दानवे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे विखे पिता-पुत्रांचा भाजप प्रवेश ही के‌वळ चर्चा आहे. भाजपकडून त्यासंबंधी काहीही हालचाली नाही. भाजपची कोणतीही उमेदवारी यादी निश्चित झालेली नसल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@