समुद्री हल्लाच्या तयारीत पाक; नौसेना प्रमुखांनी साधला निशाणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2019
Total Views |
 


नवी दिल्ली : नौसेना प्रमुख सुनील लांबा यांनी पुलवामा हल्लाबद्दल पाकिस्तानचे नाव न घेता निशाणा साधला आहे. भारताला अस्थिर ठेवू पाहणाऱ्या शेजारी देशाला भारतीय वायुसेनेने नुकताच धडा शिकवला आहे. आता दहशदवाद पोसणाऱ्यांकडून भारताच्या सीमांवर समुद्रीमार्गे हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. दहशतवाद्यांना समुद्रामार्गे हल्ला करण्यासाठी प्रशिक्षित केले जात आहे. जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यात ४० सीआरपीएफच्या जवान शहिद झाले. यापूर्वी २६/११ हल्ल्यावेळी दहशतवादी समुद्री मार्गाने घुसले होते.

 

दहशतवाद ही आंतरराष्ट्रीय समस्या

 

नौसेना प्रमुखांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील विशेषज्ञांच्या परिषदेत त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. गेल्या काही वर्षात दहशतवादाने डोके वर काढल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवादापासून धोका नाही, असे फार कमी देश आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही मोठी समस्या असल्याचे ते म्हणाले.

 

पाकवर नाव न घेता निशाणा

 

नौसेना प्रमुखकांनी भारताला दहशतवादामुळे कराव्या लागणाऱ्या समस्यांबद्दल सांगताना पाकिस्तानचे नाव न घेता निशाणा साधला. ते म्हणाले,. भारताच्या शेजारील देश दहशतवाद्यांच्या मदतीने भारताला अस्थिर करू पाहत आहेत. मात्र, आम्हीही त्यांना चोख प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांचा तळ उध्वस्त केला.

 

दरम्यान मंगळवारी पाकिस्तानी नौसेनेने भारत पाकच्या हद्दीत घुसखोरी करत असल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी नौदलाने या प्रकरणी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. मात्र, भारतीय नौदलाने हा दावा फोल ठरवला आहे. पाकिस्तान आपली सीमा सांगत आहे ती आंतरराष्ट्रीय सीमा असल्याचे भारतीय नौदलाने स्पष्ट केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@