पाकिस्तानला घरात घुसून मारणारा ‘हा’ गुप्तहेर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2019
Total Views |


 
 
 
मुंबई : अभिनेता जॉन अब्राहमच्या ‘RAW- रोमियो अकबर वॉल्टर’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यानच्या कालखंड या सिनेमात दाखवण्यात आला आहे. जॉन अब्राहमने भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. पाकिस्तानमध्ये एका मिशनवर जॉनला भारताकडून पाठवले जाते. या मिशन दरम्यान जॉनला करावा लागणारा खडतर संघर्ष या सिनेमातून दाखविण्यात आला आहे.
 

‘RAW- रोमियो अकबर वॉल्टर’ या सिनेमात जॉन अब्राहम वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांनी जॉनचे हे निरनिराळे लूक डिझाईन केले आहेत. अभिनेता जॅकी श्रॉफ या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेत्री मौनी रॉय या सिनेमात झळकणार आहे. सिनेमाचे चित्रिकरण ६० दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आले. रॉबी ग्रेवाल यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून अजय कपूर या सिनेमाचे निर्माते आहेत.

 
 
 

“सध्या देशात चालू असलेल्या परिस्थितीमध्ये ‘RAW- रोमियो अकबर वॉल्टर’ या सिनेमाची कथा लोकांसमोर येणे आवश्यक आहे. हा सिनेमा अशा व्यक्तींच्या सन्मानार्थ तयार करण्यात आला आहे. ज्यांनी देशासाठी आपले सर्वस्व पणाला लावले. परंतु त्यांना आज कोणी ओळखत नाही. माझ्यासाठी आतापर्यंतची ही सर्वात आव्हानात्मक भूमिका होती. या सिनेमासाठी मला संवादफेक कौशल्यावर काम करावे लागले. तसेच या व्यक्तिरेखेचा अभ्यास करावा लागला. यासाठी मला अनेक गोष्टी आत्मसात कराव्या लागल्या. असे या भूमिकेविषयी जॉनने सांगितले.

 

अभिनेता जॉन अब्राहमचे यापूर्वी प्रदर्शित झालेले ‘परमाणु’ आणि ‘सत्यमेव जयते’ हे दोन्ही सिनेमे देशभक्तीवर आधारित होते. ‘RAW- रोमियो अकबर वॉल्टर या सिनेमासाठी जॉन अब्राहमची निवड खूप विचारपूर्वक करण्यात आली आहे. असे या सिनेमाचे निर्माते अजय कपूर यांनी म्हटले. सिनेमाचे कथानक ऐकून जॉनने लगेच यासाठी होकार दिला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@