जम्मू-काश्मीरची दोन चित्रे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2019
Total Views |


 
 

देशाविरोधात बोलणार्‍यांच्या घोषणांना गाडण्याचे काम अफझल गुरूच्याच मुलाने केले असूनभारतीय असल्याचा अभिमान वाटतो,” असेही कबूल केले. काश्मीर खोर्‍यात तयार झालेल्या दहशतवादाची जीवघेणी बंदुक की जीवनानंदाची संदूक, या दोन चित्रांचाच हा एक दाखला असल्याचे म्हणता येईल. कसे ते पाहुया.

 

फेब्रुवारी २०१६ मध्ये दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील देशविरोधी, देशविघातक घोषणांचे प्रकरण भलतेच गाजले. ‘टुकडे टुकडे गँग’च्यादृष्टीने इथे दिलेल्या घोषणा अभिव्यक्तिस्वातंत्र्य होते, तर राष्ट्रवादी विचारांच्या संस्था, संघटना व नागरिकांच्या मते फुटीरतेची विषवल्ली! जेएनयुमध्ये हा सगळा प्रकार घडवून आणला तो संसदेवर हल्ला केलेल्या अफझल गुरूच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि इथे अशीही एक घोषणा देण्यात आली की, “कितने अफजल मारोगे, हर घर से अफझल निकलेगा!” संसदेवर दहशतवादी हल्ला केलेल्या देशद्रोह्याच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍यांना यातून जणू काहीतुम्ही दहशतवादाला कितीही विरोध केला तरी आम्ही तुम्हाला पुरून उरू,’ असेच सुचवायचे होते. आता मात्र देशाविरोधात बोलणार्‍यांच्या घोषणांना गाडण्याचे काम अफझल गुरूच्याच मुलाने केले असूनभारतीय असल्याचा अभिमान वाटतो,” असेही कबूल केले. काश्मीर खोर्‍यात तयार झालेल्या दहशतवादाची जीवघेणी बंदुक की जीवनानंदाची संदूक, या दोन चित्रांचाच हा एक दाखला असल्याचे म्हणता येईल. कसे ते पाहुया.

 

वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या अफझल गुरुच्या मुलाला म्हणजेच गालिबला नुकतेच भारतीय राष्ट्रीय ओळखपत्र म्हणजेच आधारकार्ड मिळाले. आधारकार्ड हाती आल्याने आनंदून गेलेल्या गालिबने डॉक्टर होण्याची इच्छाही व्यक्त केली, सोबतच आपल्या आईचेही आभार मानले. आईचे आभार का? तर अफझल गुरूने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गालिबवरही धर्मांध जिहाद्याचा जामानिमा चढवण्याची मनिषा दहशतवादी संघटना बाळगून होत्या. मात्र, दहशतवाद्यांच्या जाळ्यात न अडकता गालिबच्या आईने म्हणजेच तबस्सुमने मुलाला मुख्य प्रवाहात आणत शिक्षण देणेच पसंत केले. म्हणूनच आज गालिब वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या एनईईटी-नीट परीक्षेची तयारी करताना दिसतो.

 

काश्मिरी तरुण-तरुणींनाच नव्हे, तर शालेय वयाच्या मुलांनाही देशाविरोधात भडकविण्याच्या पाताळयंत्री कारवाया गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहेत. काश्मीर आणि भारत वेगवेगळे देश आहेत, असे सांगत उर्वरित भारतीयांबद्दल तसेच सरकारबद्दल द्वेषभावना प्रस्थापित करणे आणि इथल्या लोकांच्या मनात मूलतत्त्ववादी विचारांची पेरणी करण्याचे काम इथे पद्धतशीरपणे केले जाते. काश्मीर खोर्‍यातल्या केवळ तीन-चार जिल्ह्यांतल्या दहशतवादी, फुटीरतावादी व दगडफेकीसारख्या प्रकारांना संपूर्ण राज्यातील जनतेचे मानस असल्यासारखे प्रोजेक्ट करणे, हा उद्योगही इथे मोठ्या प्रमाणावर चालतो. परिणामी देशातल्या बहुसंख्य नागरिकांना संपूर्ण जम्मू-काश्मीर राज्य व इथले लोक भारतविरोधी असल्याचे वाटते. दहशतवादी संघटना याचाच फायदा घेऊन कोवळ्या वयातल्या काश्मिरींना गळाला लावतात, इस्लामचा-कुराणाचा दाखला देत जिहादला प्रोत्साहन देतात आणि नंतर हेच लोक इथे-तिथे धुमाकूळ घालू लागतात. मात्र, जम्मू-काश्मिरातली स्थिती आपल्यासमोर आलेल्या प्रतिमेहून निराळीच आहे. खोर्‍यातल्या तीन-चार जिल्ह्यातल्या मूठभरांना कट्टरतावादाच्या विखारात गुरफटविणारे वगळल्यास जम्मू आणि लडाख हा भाग दहशतवाद वा फुटीरतावादापासून पुष्कळ दूर असल्याचे दिसते.

 

इथे कधीही भारतविरोधी कारस्थानांना थारा मिळाल्याचे अनुभवायला येत नाही. इथल्या नागिरकांची भारताशी जुळलेली नाळ अधिकाधिक दृढ होत असल्याचेच पाहायला मिळते. अशा विचारांचेच काश्मिरी विद्यार्थी उर्वरित देशात उच्च शिक्षणासाठी वा कामधंद्यासाठी बाहेर पडतात. पण, काश्मीरची पुरेशी माहिती नसलेल्यांकडून या लोकांची खिल्ली उडवली जाते, शेरेबाजी केली जाते व कधी कधी मारहाणही केली जाते, जे सर्वथा चुकीचेच. उलट भारताला आपले मानणार्‍या या विद्यार्थ्यांशी आपली वर्तणूक देशबंधूसारखीच असायला हवी; जेणेकरून भारतविरोधी ताकदी देशातल्या काश्मिरीविरोधी घटनांचा वापर आपल्या स्वार्थासाठी करणार नाहीत.

 

आता विषय येतो तो, अफझल गुरूच्या मुलाचा म्हणजेच गालिबचा आणि बुर्‍हान वानीचा तसेच नझीर अहमद वानी यांचाही. स्वतःचे वडील दहशतवादी कारवायांत अडकलेले असतानाही गालिबने मात्र तो मार्ग टाकून योग्य रस्ता निवडला. अफझल गुरू हा गुन्हेगार होता, दहशतवादी होता व फाशीही गेला. गालिब किंवा गालिबची आई हे दोघेही गुन्हेगार नाहीत वा दहशतवादीही नाहीत. गालिबसारखेच हजारो, लाखो काश्मिरी पाकपुरस्कृत आझादीच्या काळ्याकभिन्न विवरात शिरण्याऐवजी देशाशी एकनिष्ठ राहण्यालाच प्राधान्य देतात. अजूनही अशी कुटुंबे असतील ज्यांच्या घरातले दहशतवादाच्या दलदलीत तर गेले मात्र घरच्यांचा विरोधच होता. अशा सर्वांच्याच पाठीशी आपणही खंबीरपणे उभे राहिले पाहजे. सध्या गालिबची चर्चा सुरू असतानाच २०१८च्या नोव्हेंबरमध्ये दहशतवादाच्या मार्गावरून परत फिरणार्‍या नझीर अहमद वानी यांचेही नाव चांगलेच गाजले. दहशतवाद्यांशी दोन हात करताना नझीर यांना वीरमरण आले आणि यंदाच्याच वर्षी त्यांना शांतीकाळातील सर्वोच्च पदक ‘अशोकचक्र’ देण्याची घोषणा राष्ट्रपती कार्यालयाकडून करण्यात आली.

 

देशाची सेवा करण्यासाठी उत्सुक असलेल्या व प्रसंगी हौतात्म्य पत्करणार्‍या घटना घडत असतानाच काश्मीर खोर्‍यात बुर्‍हान वानीसारखी अपप्रवृत्ती निपजल्याचेही दृष्टीस पडते. भारतीय सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत २०१६ मध्ये बुर्‍हान वानीचा खात्मा करण्यात आला. बुरहानच्या मृत्यूनंतर मात्र खोर्‍यावर शोककळा पसरल्याचे दिसले. वानीच्या जनाजाला हजारो लोक जमा झाल्याचे पाहायला मिळाले. ज्याने देशाविरोधात दहशतवादी कारवायांतून युद्ध पुकारले, त्याच्या अंत्ययात्रेला मोठा जनसमुदाय एकत्र झाल्याचे पाहून देशात खळबळही माजली. पुढे पुढे बुर्‍हान वानीचा नव्हे, तर नझीर वानीचा आदर्श घ्या, अशा पद्धतीची आवाहने, पोस्ट व संदेशही प्रसारित करण्यात आले, जे बरोबरच होते. पण, बुर्‍हान वानी, नझीर वानी आणि आता गालिबच्या उदाहरणावरून काश्मीर खोर्‍याची दोन चित्रे नजरेस पडतात. एक चित्र जसे आश्वासक आहे, तितकेच दुसरे चित्र विघातक. यातल्या एका मार्गावर अर्थातच जीवनाचा आनंद पुरेपूर घेण्याचे तर दुसर्‍या मार्गावर सुरक्षा दलांच्या गोळीला बळी पडण्याचे निश्चित आहे. अशा दोन चित्रातले नेमके कोणते चित्र निवडायचे, हे मात्र काश्मिरींच्याच हातात आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@