हाफिज सईदच्या संघटनांवर बंदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2019
Total Views |
 


इस्लामाबाद : २६/११ या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सुत्रधार हाफिज सईदच्या दोन दहशतवादी संघटनांवर पाक सरकारने बंदी घातली आहे. जमात उद दावा आणि फलाह ए इन्सानियत अशी बंदी घालण्यात आलेल्या दोन दहशतवादी संघटनांची नावे आहेत. पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी कायदा १९९७ या अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

 

जम्मू काश्मीरच्या पुलवामा या भागात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव आणल्यानंतर पाकिस्तानने आता मसुद अझरच्या भावासह ४४ दहशतवाद्यांना अटक केली. ही कारवाई मंगळवारीच करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता पाकिस्तानने हाफिज सईदच्या दोन दहशतवादी संघटनांवरही बंदी घालण्याची कारवाई केली आहे.


पाकिस्तानने जो हल्ला घडवला त्यानंतर १२ दिवसांनी भारतीय वायुदलाने बालाकोट या ठिकाणी हवाई हल्ला करून पुलवामाचे चोख प्रत्युत्तर दिले. याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारताच्या हवाई हद्दीत शिरण्याचा प्रयत्न केला मात्र, भारतीय वायुदलाने अत्यंत शिताफीने आणि वेगाने या विमानांना पळवून लावले होते. भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानात गेले आणि पाकिस्तानी लष्कराच्या तावडीत सापडले. सुमारे ६० तासांनी मायदेशी पाठवले. आता पाकिस्तानने हाफिज सईदच्या दोन दहशतवादी संघटनांवर बंदीची कारवाई केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@