‘अमूल’कडून ‘अभिनंदन’ला अनोखी मानवंदना!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
मुंबई : भारताचे वीरपुत्र अभिनंदन यांची शुक्रवारी १ मार्च रोजी पाकिस्तानच्या ताब्यातून सुटका करण्यात आली. भारताच्या हद्दीत घुसखोरी करू पाहणाऱ्या पाकिस्तानी ‘एफ-१६’ या लढाऊ विमानांना परतवून लावताना झालेल्या संघर्षामध्ये अभिनंदन यांचे ‘मिग-२१’ हे लढाऊ विमान पाकिस्तानमध्ये कोसळले. पाकिस्तानमधून परत आल्यानंतर अभिनंदन यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशवासियांनी अभिनंदन यांचे भारतात स्वागत केले. जाहिरातींमधील आपल्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘अमूल’ने अभिनंदन वर्धमान यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली आहे.
 
 
 
 

देशभरातील अनेक लहानमोठ्या शहरांमध्ये सध्या अभिनंदन यांच्यासारखी मिशी ठेवण्याचा ट्रेंड दिसू लागला आहे. अनेक तरुणांनी अभिनंदन वर्धमान यांच्यासारख्या मिशा ठेवण्यास सुरुवात केली आहे. अभिनंदन यांच्यासारख्या मिशांचा हा ट्रेंड लक्षात घेऊन अमूलने एक जाहिरात केली आहे. बदलत्या काळाप्रमाणे बदलत जाणारा मिशांचा ट्रेंड, मिशांचे वेगवेगळे प्रकार या जाहिरातीतून दाखवण्यात आले आहेत.

 
 
 
 

सामान्य तरुणांपासून ते पोलीसांपर्यंत अनेकजण आपल्या मिशांना पिळ देताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. व्हिडिओच्या शेवटी ग्लासभर दूध पिऊन एका लहान मुलीच्या ओठांवर दुधाच्या मिशा तयार झालेल्या दिसतात. मूछ नही तो कुछ नही अशी संकल्पना यातून मांडण्यात आली आहे. या ९ सेकंदाचा व्हिडिओ अमूलने ट्विट केला आहे. अमूलकडून अभिनंदनसाठी ही अमूल मिशी अशी कॅप्शन अमूलने या व्हिडिओला दिली आहे. तसेच शुक्रवारी १ मार्चला अमूलने ‘अमूल गर्ल’च्या खास शैलीत कार्टूनद्वारे अभिनंदचे भारतात स्वागत केले होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@