एअर इंडियाच्या विमानप्रवासात ‘जय हिंद’ म्हणणे बंधनकारक!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
मुंबई : एअर इंडियाच्या विमानप्रवासात आता ‘जय हिंद’चा नारा देणे, बंधनकारक असणार आहे. एअर इंडियामध्ये प्रत्येक उद्घोषणेनंतर ‘जय हिंद’चा नारा देण्यात येईल. असा नियम तातडीने लागू करण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतला आहे. एअर इंडियाकडून सर्व क्रू मेंबर्सना याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता एअर इंडियाच्या प्रवाशांना आपल्या विमानप्रवासात ‘जय हिंद’ची घोषणा ऐकू येणार आहे.
 

‘जय हिंद’चा नारा देणे, एअर इंडियाच्या सर्व क्रू मेंबर्सना बंधनकारक असणार आहे. एअर इंडियाच्या वैमानिकांसाठीदेखील ‘जय हिंद’चा नारा देणे बंधनकारक असणार आहे. एअर इंडियाच्या या नियमानुसार, प्रवासादरम्यान सर्व कर्मचाऱ्यांना विमानातील प्रत्येक जाहीर निवेदनानंतर थोडे थांबून उत्साहात ‘जय हिंद’चा नारा देण्यास एअर इंडियाकडून सांगण्यात आले आहे. एअर इंडियामध्ये सध्या ३५०० कॅबिन क्रू आणि १२०० कॉकपिट क्रू मेंबर्स आहेत.

 

एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आश्विनी लोहानी यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात २०१६ मध्ये वैमानिकांना हा निर्देश जारी केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना या आदेशाची आठवण करून देण्यात आली आहे. विमान उड्डाणादरम्यान वैमानिकांनी सर्व प्रवाशांसह ‘जय हिंद’च्या घोषणा द्यायच्या. असे आश्विनी लोहानी यांनी यापूर्वी २०१६ मध्ये सांगितले होते. या गोष्टीची आता त्यांनी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना आठवण करून दिली आहे. सध्या देशात असलेल्या वातावरणामुळे कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा ‘जय हिंद’च्या घोषणेची आठवण करून देण्यात आली असल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात आले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@