मसूद अझहरच्या मृत्यूची फक्त 'अफवाच'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2019
Total Views |


 

नवी दिल्ली : 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहर याचा पुलवामा हल्ल्यात सहभाग होता. भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर अनेक दहशतवादी ठिकाणी उधळून टाकली. त्यानंतर रविवारी पाकिस्तानी प्रसार माध्यमांकडून मसूद अझहरच्या मृत्यूची बातमी पसरवण्यात आली. परंतु आता ती अफवाच असल्याचा दावा पाकीस्तानी प्रसारमाध्यमे करत आहे. २ मार्च रोजी 'जैश'चा सर्वेसर्वा मसूद अझहरचा मृत्यू झाला आहे असे सांगण्यात येत होते.

 

मसूद अजहर हा गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होता. त्याची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली होती. पाकिस्तानमधील रावळपिंडी येथील एका लष्करी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. मसूद अजहर हा पाकिस्तानात असून तो इतका आजारी आहे की घराबाहेरही पडू शकत नाही. अशी माहिती काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी दिली होती. त्यानंतर २ मार्चला त्याचा मृत्यू झाला असल्याची बातमी आली. परंतु, पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी ती अफवाच असल्याचे स्पष्ट केले.

 

मसूद हा ओसामा बिन लादेनचा निकटवर्तीय मानला जातो. ओसामाने अनेक आफ्रिकी देशांमध्ये दहशतवाद वाढवला. तसेच ब्रिटनमधील मशिदींमध्ये त्याने जिहादाचे शिक्षण दिले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ५० वर्षीय मसूदचा प्रभाव भयानक होता. इंडियन एअरलाईन्सच्या आयसी-८१४ या विमानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. हे विमान सोडवून घेण्यासाठी भारताने अटकेत असलेल्या मसूदला ३१ डिसेंबर १९९९ रोजी सोडले होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@