गिरगाव व जुहू चौपाटींना ‘क्लिन स्ट्रीट फूड हब’ दर्जा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2019
Total Views |
 

मुंबई : गिरगाव व जुहू चौपाटी यांना क्लिन स्ट्रीट फूड हबदर्जा प्राप्त झाला आहे. मंगळवार (दि. ) सायंकाळी ५.३० वाजता गिरगाव चौपाटी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्धाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरवार, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी आदी उपस्थित राहणार आहेत.

 

मुंबईमधील प्रसिद्ध गिरगाव व जुहू चौपाटी येथे अन्न व औषध प्रशासन,महानगरपालिका तसेच अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्यासमवेत संयुक्त तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये अन्न पदार्थ हाताळताना घ्यावयाची दक्षता याबरोबरच फूड स्टॉलच्या आसपासची स्वच्छता, त्यांची सुटसुटीत रचना, कचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचा निचरा आदी बाबी लक्षात घेवून सर्वेक्षण करण्यात आले होते. तेथील फूड स्टॉलधारकांची कार्यशाळा आयोजित करुन त्यांना अन्न सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

 

गिरगाव व जुहू चौपाटी येथील अन्न व्यवसायिकांची स्वच्छतेसंदर्भातील मानकांची पुर्तता तसेच अन्न सुरक्षितेबाबत सर्व निकषांचे पालन होत असल्याने गिरगाव व जुहू चौपाटी यांना क्लिन स्ट्रीट फूड हबदर्जा प्राप्त झाला आहे. यासाठी अन्न सुरक्षा आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनातील बृहन्मुंबई विभागाचे सहआयुक्त शैलेश आढाव आदींनी वेळोवेळी तपासण्या, कार्यशाळा, ऑडिट तसेच सर्वेक्षण यामुळे या दोन्हीठिकाणांना क्लिन स्ट्रीट फूड हबहा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य हे देशातील क्लिन स्ट्रीट फूड हबदर्जा प्राप्त दुसरे राज्य ठरले आहे.

 

काय आहे क्लिन स्ट्रीट फूड हब ?

अन्न पदार्थाचा दर्जा राखून ग्राहकांना स्वच्छ वातावरणात चांगल्या प्रतीचे सुरक्षित व पौष्टिक अन्नाचा आस्वाद घेता यावा, यासाठी देशांतर्गत ज्याठिकाणी मोठ्या संख्येने खाद्य पदार्थाची विक्री केली जाते, अशा ठिकाणी क्लिन स्ट्रीट फूड हबही संकल्पना राबविण्यात येत आहे. याठिकाणी नागरिकांना स्वच्छ व निर्भेळ अन्न मिळावे म्हणून अन्न पदार्थाबरोबरच सभोवतालच्या परिसर स्वच्छता आदी बाबींची परीक्षणाअंती पुर्तता करुन त्या ठिकाणास क्लिन स्ट्रीट फूड हबचा दर्जा देण्यात येतो. याप्रकारे देशातील पहिले क्लिन स्ट्रीट फूड हबम्हणून गुजरातमधील अहमदाबाद येथील कांकरिया लेक घोषित करण्यात आलेले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@