बालाकोट हल्ला : कारवाईपूर्वी ३०० मोबाईल होते सुरू !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2019
Total Views |


नवी दिल्ली : पाकिस्तानी बालाकोट स्थित दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय वायुदलाने हल्ला केल्यानंतर विरोधी पक्षांनी केंद्राकडे पुरावे मागण्यास सुरूवात केली असली तरीही एअर स्ट्राईकबद्दल मोठे सत्य उघडकीस आले आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे हा खुलासा झाला आहे.

 

गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, दहशतवादी तळ उध्वस्त करण्यापूर्वी या ठिकाणी एकूण तिनशे मोबाईल फोन कार्यरत होते. यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर दहशतवादी येथे लपून बसल्याचे अंदाज यावरून येतो. या ठिकाणी हल्ल्याच्या पूर्वी एकूण तिनशे मोबाईल फोन सुरू होते. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा या भागात वायुसेनेने परवानगी दिल्यानंतर राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेने (एनटीआरओ) याबाबत माहिती घेतली होती. या भागात एकूण तिनशे मोबाईल फोन कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वायुसेनेने मिराज २००० लढाऊ विमानाद्वारे हल्ला केला.

 

तिनशे मोबाईल फोन या ठिकाणी कार्यरत असल्याची माहिती वायुसेनेला मिळाली होती. त्यानंतर काही दिवसांनी हा हल्ला करण्यात आला. अन्य यंत्रणांनीही एनआरटीओच्या या माहितीला पुष्टी दिली होती. दरम्यान या ठिकाणी मारलेल्या दहशतवाद्यांचा नेमका आकडा अद्याप कळू शकलेला नाही. वायुसेनेचे प्रमुख बी.एस.धनोआ यांनी सोमवारी कोईम्बतूर येथील पत्रकार परिषदेत आम्ही आमचे लक्ष्य साध्य करण्याचे काम करतो. तिथे झालेले नुकसान मोजण्याचे काम आम्ही करत नाही. आम्ही पाहतो कि लक्ष्य भेदले कि नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@