वायुसेनेचे 'मिग २७' लढाऊ विमान राजस्थानात कोसळले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2019
Total Views |



जयपूर : इंजिनमध्ये बिघाड झाल्याने भारतीय वायुसेनेचे 'मिग २७ युपीजी' लढाऊ विमान राजस्थान येथे कोसळले. पायलटने उडी मारल्याने तो थोडक्यात बचावला. मात्र विमान पूर्णपणे चक्काचूर झाले. या विमानाने नियमित सरावासाठी जोधपूर येथील वायुसेनेच्या तळावरुन उड्डाण घेतली होती. सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी या विमानाने जोधपूरच्या उत्तरलाई विमानतळावरुन उड्डाण घेतली होती. त्यानंतर दक्षिणेकडे १२० किलोमिटर अंतरावर जाऊन तो कोसळला.

 

तपास यंत्रणेच्या तपासानंतरच विमान कोसळण्याचे मुख्य कारण समोर येणार. या तपासाची चौकशी न्यायालय करेल, असे भारतीय वायुसेनेने म्हटले आहे.यापूर्वी ४ सप्टेंबर २०१८ ला मिग-२७ विमान राजस्थान येथे कोसळला होता. या विमानाने याच तळावरून उडान घेतली होती. तर, फेब्रुवारीमध्ये मिराज-२००० विमान बंगळुरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)च्या धावपट्टीवरच कोसळले होते. तर, यापूर्वी भारतीय वायुसेनेचे सुखोई-३० नाशिक येथे कोसळले होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@