अमित शाह यांचे शक्तिप्रदर्शन; घटकपक्षाच्या नेत्यांनी हजेरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2019
Total Views |


 


गांधीनगर : पहिल्यांदा लोकसभा निवडणूक वाढविणारे भाजपाध्यक्ष अमित शाह आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन शाह यांच्या रोड शोला सुरुवात करण्यात आली. यावेळी शाह यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी घटकपक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावत शाह यांना विक्रमी मतांनी विजयी करा असे आवाहन गांधीनगरच्या जनतेला केले.

 

शाह यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अकाली दलाचे प्रकाश सिंह बादल, लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितिन गडकरी व इतर नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवंगत अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणींनी ज्या लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले, त्याच मतदार संघाचे मला तिकीट मिळाले हे माझे भाग्य असल्याचे शाह यावेळी म्हणाले.

 

शाह यांच्या विजय संकल्प रॅलीमध्ये उपस्थित जनतेला संबोधित करताना शाह म्हणाले, "जगातील सर्वात मोठ्या पक्षाची पत्रक वाटत वाटत आज त्याच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो आहे. माझ्या जीवनातून भाजपाला काढून टाकले तर खाली काहीही उरत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच देशाला सुरक्षित ठेऊ शकतात." यावेळी त्यांनी मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी गुजरातच्या जनतेला मी सर्वच्यासर्व २६ खासदार निवडून देण्याचे आवाहन केले.

 

विजय संकल्प रॅलीमध्ये उपस्थित राहिलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन गांधीनगरमधील मतदारांना केले. यावेळी त्यांनी आमच्यात मतभेद होते पण आता आमची मन जुळलेली आहेत असेही सांगितले. राजनाथ सिंह यांनी विरोधकांचा समाचार घेत चौकीदार चोर नाहीतर प्युअर असून त्याचे पुन्हा पंतप्रधान बनणे श्युअर असल्याचे सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@