पुढच्या २५ वर्षाचा विकास आराखडा तयार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2019
Total Views |



'त्यां'ना 'भलाई'पेक्षा 'मलाई'ची चिंता

 

नवी दिल्ली : शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरुणाचल प्रदेशातील आलो येथील जनसभेला संबोधीत केले. त्यावेळी त्यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडले. तर, ५ वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या कामकाजाचा आढावाही जनतेसमोर मांडला. दहशतवादाविरोधात पाकिस्तानमध्ये घुसून आपण सर्जिकल स्ट्राईक केले. त्यावेळी काँग्रेसची काय प्रतिक्रिया होती हे आपण पाहिले. एवढेच नाही तर आपण वैज्ञानिक संशोधनांनी संपूर्ण जगाला चकित करत आहोत. मात्र, त्यातही हे लोक त्रुट्या काढतात, असे मोदी यावेळी म्हणाले.

 

दिल्ली पोलीस पथकात अरुणाचल प्रदेशच्या अनेक मुली आहेत. त्यांचा मला अभिमान वाटत असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले. येथील मुली एवरेस्ट सारखे उंच शिखरही सर करतात. याचाही संपूर्ण देशाला गर्व असल्याचेही मोदी म्हणाले. ज्या गोष्टींवर देशाला गर्व होतो. त्या गोष्टींवर यांना दुःख होते असल्याचा टोलाही त्यांनी विरोधकांना लगवला. मागील पाच वर्षाच्या अनुभवावर मी पुढील २५ वर्षाचा विकास आराखडा तयार केला आहे. तोच आराखडा घेऊन मी आपल्या पुढे आलो आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले. अरुणाचल प्रदेश येथे आधुनिक इंफ्रास्ट्रक्चरची गरज आहे. मात्र नामदार कुटुंब येथे राज दरबारी सल्तनतला मजबूत करण्यासाठी काम करत आहेत, अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर टीका केली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@