मेट्रोचे काम सुरु असताना पुण्यात सापडले भुयारी मार्ग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2019
Total Views |



 

पुणे : शहरात मेट्रोचे काम सुरु असताना स्वारगेटजवळ दोन भुयारे मार्ग आढळून आले आहेत. स्वारगेटला मल्टीमोडल हब उभारणीचे काम जोरात सुरु असून यासाठी पायलिंग मशीनद्वारे खोदकाम सुरु असताना ही भुयारे १२ ते १५ फुटांवर आढळून आली. ही भुयारे स्वारगेट जलकेंद्राची असल्याची माहिती समोर येत असून स्वारगेट येथील कॅनॉलमधून पाणी घेऊन ते जलकेंद्राला पुरविण्यासाठी या दोन स्वतंत्र वाहिन्या शंभर वर्षांपूर्वी बांधल्या गेल्याचे सांगितले जात आहे.

 
स्वारगेट ते शिवाजीनगर ऍग्रीकल्चर कॉलेज येथे मेट्रोच्या भुयारी मार्गासाठी काम चालू असताना, अचानक जमीन खचून तिथे १० फुटाचा खड्डा पडला. यानंतर महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) अधिकाऱ्यांनी खड्डा का पडला याची तपासणी केली असता त्यांना ही भुयारे आढळून आली. या भुयारांची या अगोदर कोठेही नोंद नसल्याने ही ही भुयारे किती जुनी आहेत याची माहिती मिळू शकली नाही.
 

मिळालेल्या माहितीनुसार, ही भुयारे दगडी बांधकाम केलेल्या पक्क्या स्थितीत आहे. ५० ते ६० मीटर इतकी या भुयारांची लांबी असून ही भुयारे ३० ते ३५ वर्षे जुने असल्याचा अंदाज आहे. या भुयाराची रुंदी तीन-साडेतीन फूट असून, उंची आठ ते दहा फुटांदरम्यान असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, ही दोन भुयारे सापडल्यानंतर मेट्रोचे काम थांबवण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@