जेट एअरवेज अडचणीत ; वैमानिक जाणार संपावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2019
Total Views |



मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजचे शुक्लकाष्ठ काही केल्या दूर होताना दिसत नाही. गेल्या काही महिन्यांचा पगार न मिळाल्याने जेट एअरवेजच्या १ हजारापेक्षा अधिक वैमानिकांनी १ एप्रिलपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.जेट एअरवेजच्या अध्यक्षपदावरुन नरेश गोयल व त्यांची पत्नी पायउतार झाल्यानंतर जेटच्या परिस्थितीत सुधारणा होईल, अशी चिन्हे होती. मात्र, अजूनही जेटच्या वैमानिकांचे पगार थकल्यामुळे जेट वैमानिकांची संघटना नॅशनल एव्हिएटर्स गिल्डने १ एप्रिलपासून विमान न उडविण्याचा निर्णय घेतला आहे.

 

जेटच्या ग्राहकांनी १ एप्रिलपासून तिकीट बुकिंग केली असेल तर वैमानिकांच्या संपाचा फटका ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे याचा फायदा प्रतिस्पर्धी असलेल्या स्पाईसजेट, इंडिगोसारख्या कंपन्यांना होणार असे सांगण्यात येत आहे. सध्या जेट एअरवेजने आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी एसबीआय कॅपिटल मार्केटसारख्या संस्थेला सल्लागार म्हणून निवडले असून या माध्यमातून जेटमध्ये मोठी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा शोध घेतला जात आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@