दहशतवादाला मुळापासून उखडून फेकण्यासाठी केंद्र सरकार ‘इन अ‍ॅक्शन’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2019
Total Views |



नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरमधील दहशतवादाविरोधातील लढाई आता निर्णायक वळणावर पोहोचल्याचे दिसते. शुक्रवारी केंद्र सरकारने दहशतवादाला मुळापासून उखडून फेकण्यासाठी ‘टेरर मॉनिटरिंग ग्रुप’ म्हणजेच ‘टीएमजी’चे गठन केले आहे. टीएमजीमध्ये सीबीआय, एनआयए आणि सीबीडीटीच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे. सर्वसामान्य काश्मिरींमध्ये मिसळून दहशतवादासाठी आर्थिक रसद पुरवणार्‍यांना समोर आणण्याचे काम ‘टीएमजी’ करेल. दहशतवाद्यांना सहकार्य करणार्‍यांत सरकारी अधिकारी असो वा शिक्षक, कोणालाही सोडले जाणार नाही.

 

आठ सदस्य असलेल्या ‘टीएमजी’चे अध्यक्ष जम्मू-काश्मिरचे पोलिस उपमहानिदेशनक आहेत. ‘टीएमजी’मध्ये जम्मू-काश्मिरच्या एक पोलिस महानिरीक्षकांचा तसे राज्याच्या आयबी शाखेचे अतिरिक्त निदेशक, केंद्रीय अन्वेषण विभाग, राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड तथा सीबीआयसीचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले की, ‘टीएमजी’चे गठन दहशतवाद्यांच्या आर्थिक रसद पुरवठ्याविरोधात चालू असलेल्या कारवायांना एकत्र करेल आणि अन्य दहशतवादसंबंधित गतिविधींना आळा घालेल. सोबतच दहशतवाद्यांप्रति सहानुभूति बाळगणार्‍यांना समोर आणून दहशतवादी जाळ्यालाही उद्ध्वस्त करेल. ‘टीएमजी’ला दहशतवादाच्या सर्वच ज्ञात-अज्ञात चेहर्‍यांविरोधात कारवाई करण्याचे ठोस अधिकार सोपवले आहेत.

 

‘टीएमजी’चे कार्य -

 

. ‘टीएमजी’ आतापर्यंत नोंदलेल्या सर्वच दहशतवादी, दहशतवाद्यांचा आर्थिक रसद पुरवठा आणि दहशतवादसंबंधित घटनांवर कारवाई करेल, तसेच त्यांना शिक्षा व्हावी म्हणून प्रयत्न करेल.

 

. दहशतवादाच्या कोणत्याही रुपातल्या समर्थकांना समोर आणणे. ज्यात विविध सघटनांच्या नेत्यांचा समावेश आहे, जे दहशतवादाच्या समर्थनात आवाज उठवतात.

 

. दहशतवादाच्या आर्थिक रसद पुरवठ्याशी संबंधित सर्वच मार्गांची चौकशी करणे आणि त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी आवश्यक कारवाई करणे.

 

. ‘टीएमजी’ दहशतवादाचे जोरकसपणे समर्थन करणार्‍यांनाही समोर आणेल. मग ते सरकारी अधिकारी असो वा शिक्षक. जे उघडपणे वा लपून-छपून दहशतवाद्यांचे समर्थन करतात, त्या सर्वांना समोर आणले जाईल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@