साईभक्तांसाठी मुंबई ते शिर्डी स्वतंत्र पालखीमार्ग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
 
मुंबई : मुंबईहून शिर्डीला दिंडी घेऊन जाणाऱ्या लाखो साईभक्तांच्या सोईकरिता स्वतंत्र पालखीमार्गाचा विकास आराखडा तत्काळ तयार करण्याचे निर्देश सार्वजानिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच दिले. स्वतंत्र पालखीमार्गाची साईभक्तांकडून वारंवार होत असलेली मागणी विचारात घेऊन शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी पाटील यांची भेट घेऊन विनंती केली होती.
 
 
त्याची तत्काळ दखल घेत पाटील यांनी तातडीने वरिष्ठ अधिकारी व डॉ. हावरे यांच्यासमवेत बैठक घेऊन, यासंदर्भात विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. साईंच्या दर्शनासाठी लाखो साईभक्त श्री क्षेत्र शिर्डी येथे जात असतात. यात मुंबईहून शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांचे प्रमाण मोठे आहे. हे सर्व साईभक्त मुंबई-आग्रा मार्ग आणि घोटी-शिर्डीमार्गे पालखी घेऊन जात असतात; मात्र महामार्गावरील भरधाव वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये अनेक साईभक्तांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे पदयात्री साईभक्तांकडून स्वतंत्र पालखी मार्ग तयार करण्याची मागणी सातत्याने होत होती.
 

या नव्या पालखीमार्गावर प्रत्येक १५ किलोमीटर अंतरावर भक्तांसाठी निवाऱ्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही पाटील यांनी दिले. संस्थानचे अध्यक्ष डॉ. हावरे यांनीदेखील “या प्रस्तावाला साई संस्थानकडून सर्वतोपरी साहाय्य करण्यात येईल,” असे आश्वासन दिले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@