पुराव्यांच्या राजकारणाची विकृती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
 
२०१६ सालच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर, भारताने असा काही हल्ला केलाच नसल्याचा, दहशतवादी मारले गेलेच नसल्याचा दावा करणाऱ्यांना आताच्या एअर स्ट्राईकची पाकिस्तानने स्वतःच केलेली पुष्टी अडचणीची ठरू लागली. मात्र, म्हणतात ना, एकमेकांवर प्रेम असले की, या मनीची गोष्ट त्या मनीही तत्काळ समजते! तशीच अवस्था एअर स्ट्राईकचे पुरावे मागण्यासाठी आसुसलेल्यांची अन् पाकिस्तानची झाली. सैन्यदलांच्या पराक्रमाला नाकारणारी जमात भारतातही बसलेली असल्याचा विचार करून सकाळी सकाळी हल्ला झाल्याचे मान्य करणाऱ्या पाकिस्तानने नंतर मात्र हल्ला झाला नसल्याचे म्हणेपर्यंत पलटी मारली. पाकिस्तानने असे म्हणताच, भारतातल्या जयचंदी प्रवृत्तीच्या पैदाशीला आनंदाच्या उकळ्या फुटल्या, मोदी सरकारला तावडीत पकडण्याची पर्वणी लाभल्याचा उत्साह या लोकांच्या तोंडावरून ओसंडू लागला.
 

देशात एका बाजूला मौलाना मसूद अझहरच्या खात्म्याची चर्चा झडलेली असतानाच भारतीय वायुसेनेने जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यांवर केलेल्या एअर स्ट्राईकचे पुरावे मागण्याचा करंटेपणा विरोधी पक्षातील भ्रमिष्टांनी सुरू केला. पाकिस्तानने पाळलेल्या जिहाद्यांचे, दहशतवादी संघटनांचे वकील असल्याच्या थाटात या मंडळींनी मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी आपली असलेली-नसलेली बुद्धी कामाला लावली. वस्तुतः २६ फेब्रुवारीला भारताने कारवाई केल्यानंतर तत्काळ पाकिस्ताननेच हल्ल्याची कबुली दिली होती. परिणामी आता पुरावे मागणाऱ्यांची मने देशाच्या नेतृत्वावर, सैन्य दलांवर, शूर सैनिकांवर प्रश्नचिन्ह ठेवण्याची, मनोबल खच्ची करण्याची संधी हुकल्याने हळहळ करू लागली. २०१६ सालच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर, भारताने असा काही हल्ला केलाच नसल्याचा, दहशतवादी मारले गेलेच नसल्याचा दावा करणाऱ्यांना आताच्या एअर स्ट्राईकची पाकिस्तानने स्वतःच केलेली पुष्टी अडचणीची ठरू लागली. मात्र, म्हणतात ना, एकमेकांवर प्रेम असले की, या मनीची गोष्ट त्या मनीही तत्काळ समजते! तशीच अवस्था एअर स्ट्राईकचे पुरावे मागण्यासाठी आसुसलेल्यांची अन् पाकिस्तानची झाली. सैन्यदलांच्या पराक्रमाला नाकारणारी जमात भारतातही बसलेली असल्याचा विचार करून सकाळी सकाळी हल्ला झाल्याचे मान्य करणाऱ्या पाकिस्तानने नंतर मात्र हल्ला झाला नसल्याचे म्हणेपर्यंत पलटी मारली. पाकिस्तानने असे म्हणताच, भारतातल्या जयचंदी प्रवृत्तीच्या पैदाशीला आनंदाच्या उकळ्या फुटल्या, मोदी सरकारला तावडीत पकडण्याची पर्वणी लाभल्याचा उत्साह या लोकांच्या तोंडावरून ओसंडू लागला. हल्ला झाल्याचे अमान्य करण्याच्या पाकिस्तानी खेळीने इथल्या बोलभांडांना आता मोदी सरकारला कसे कसे आणि किती किती प्रश्नांच्या चक्रव्यूहात अडकवू, असे झाले.

 

वायुसेनेच्या एअर स्ट्राईकवर शंका घेण्याचे, मृत दहशतवाद्यांचे आकडे मागण्याचे लोण देशातल्या विरोधी गोटात पसरले. एअर स्ट्राईकवरील संशयकल्लोळाची सुरुवात ममता बॅनर्जींनी केली तर दिग्विजय सिंग, शरद पवार आणि जोडीला स्वतःला विचारवंत, बुद्धीजीवी, पत्रकार-लेखक म्हणविणारे लोक केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी थयथयाट करू लागले. आपल्या शंका-कुशंका-लघुशंकांतून या सगळ्यांनीच केंद्र सरकारचे, संरक्षण मंत्रालयाचे आणि सैन्यदलांचे मनोबल खच्ची करण्याचे डावपेच आखल्यासारखी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला, ही गोष्ट खरी कशावरून? केंद्र सरकार म्हणते म्हणून आम्ही कसा विश्वास ठेवू शकतो? जागतिक स्तरावरील वृत्तसंस्था तर निराळेच काहीतरी सांगताहेत, मग आमची खात्री कशी पटावी? अशी खुसपटे काढून या मंडळींनी मोदीद्वेषापायी एअर स्ट्राईकच्या सत्यतेविरोधातच मोहीम उघडली. केवळ राजकीय विरोधापायी आपण करत असलेल्या बडबडीचा फायदा पाकिस्तानला होईल, देशात दुही, दुफळी माजेल, याचे भानही या लोकांना राहिले नाही. कदाचित असेच व्हावे, हीदेखील या लोकांच्या अंतःकरणातील इच्छा असावी, जी अशाप्रकारे उफाळून वर आली. मात्र, हाय रे दैवा! एअर स्ट्राईकनंतर मोदी सरकारच्या नावाने खडे फोडून, शिव्याशाप देऊन आपण आता देश जिंकल्याच्या आविर्भावात बरळणाऱ्यांचे पाय जमिनीला लागेल, अशी माहिती नुकतीच उघड झाली. शनिवारी समोर आलेल्या माहितीनुसार सिंथेटिक अपार्चर रडार-एसएआरद्वारे वायुसेनेच्या विमानांनी हल्ला केलेल्या ठिकाणांच्या काढलेल्या छायाचित्रातून जैश-ए-मोहम्मदच्या चार इमारती जमीनदोस्त झाल्याचे स्पष्ट झाले. इतकेच नव्हे तर नुकतेच जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरच्या मौलाना अम्मार या धाकट्या भावानेच एका ध्वनिफितीच्या माध्यमातून एअर स्ट्राईक झाल्याचे स्वीकारले.

 

भारताच्या हल्ल्याने जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण केंद्रांचा विध्वंस झाल्याचे सांगत मौलाना अम्मार याने या हल्ल्याला ऐलान-ए-जंग म्हटले. शिवाय आजच नव्हे तर याआधी २८ फेब्रुवारीला पेशावरमधील एका कार्यक्रमातही अम्मारने हेच रडगाणे गायले होते. परिणामी मौलाना अम्मारच्या कबुलीजबाबामुळे पाकिस्तानी सरकार आणि भारतातल्या तमाम मोदीद्वेष्ट्यांच्या संशयी फुग्यातली हवाच निघून गेली. परंतु, दहशतवाद्यांविरोधातील एअर स्ट्राईकने जनतेच्या गळ्यातले ताईत झालेल्या मोदींना विरोध करणाऱ्यांचे काय? ते अजूनही पुरावेच मागताना दिसतात. वस्तुतः वायुसेनाप्रमुखांनी प्रारंभीच एअर स्ट्राईकचे पुरावे केंद्र सरकारकडे सुपूर्द केल्याचे म्हटले होते. सोबतच योग्यवेळी ते जाहीर करण्यात येतील, असेही सांगितले गेले. मात्र, पुरावे सार्वजनिक केले नाहीत, म्हणजे दहशतवाद्यांविरोधात कारवाईच केली नसल्याचा विकृत आनंद देशातलेच काही सडक्या मेंदूवाले साजरा करताना दिसतात. खरे म्हणजे दहशतवाद्यांविरोधात गुप्तचर यंत्रणांच्या संदेश व माहितीनंतर पाऊल उचलले जाते. बालाकोटमधील हल्लाही तसाच होता. तिथे पुलवामातील भारतीय जवानांच्या मृत्युचा जश्न करण्यासाठी दहशतवादी भुतावळ एकत्र येत असल्याचे सुरक्षा दलांना गुप्तचरांकडून समजले व नंतर वायुसेनेने हल्ला केला. भारताने या हल्ल्यात एक हजार किलोच्या बॉम्बचा वापर केल्याने दहशतवादी एकत्र आलेल्या इमारतींची राख झाली, यातूनच तिथले ३५० पेक्षा अधिक जण ठार झाल्याचे पुढे आले. विशेष म्हणजे जी मंडळी परदेशी वृत्तसंस्था वा पाकिस्तानच्या हवाल्याने असे काही घडलेच नसल्याचे सांगतात, त्यांच्याकडे संबंधित ठिकाणाची तब्बल ७२ तासानंतरची माहिती व छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती आहेत. ज्यातून तिथे ना मृतदेह ना, इमारतीचा राडा-रोडा दिसतो ना अन्य काही. मात्र, जे यालाच आधार मानून एअर स्ट्राईकवर संशय घेतात, त्यांना पाकिस्तान ७२ तासांत तिथल्या मृतदेहांची विल्हेवाट लावू शकतो, हा विचारही करता येत नाही की, या लोकांना असे वाटते, इमरान खान स्वतः म्हणतील, “हो, हे काय दहशतवाद्यांचे मृतदेह!” तर असे कधीच होणार नाही. पाकिस्तान स्वतः हे कधीच कबूल करणार नाही. कारण आपल्या भूमीवर दहशतवादी नाहीत, हे सांगितले तरच त्या देशाला बडी राष्ट्रे भीक देणार असतात ना? म्हणूनच पाकिस्तानच्या दाव्यांवर व ७२ तासांनंतरच्या माध्यम अहवालांवर विसंबून राहता येत नाही.

 

दुसरीकडे एअर स्ट्राईकवरून राजकारण करू नका म्हणणाऱ्यांनीच आता या मुद्द्याचे राजकारण केल्याचे, पुरावे मागण्याच्या वृत्तीतून दिसते. पण जसे प्रत्यक्ष रणांगणावर युद्ध सुरू असते, तसेच ते मानसशास्त्रीयदृष्ट्याही लढले जाते. संबंधित देशातल्या जनतेत वैचारिक गोंधळ निर्माण करून हवे ते साध्य करण्याचा दुष्ट हेतू शत्रू देशाचा असतो. आधी एअर स्ट्राईक झाल्याचे स्वीकारणे, नंतर नाकारणे, पुढे अभिनंदन वर्धमान यांची काटछाट केलेली ध्वनिचित्रफित प्रसारित करणे, अशा डावपेचांतून पाकिस्तानने हेच केले. दुर्दैवाने देशातल्या राजकारण्यांनीही पाकधार्जिणी भूमिका घेत वायुसेनेच्या व मोदी सरकारच्या पराक्रमावर सवाल केले. दिग्विजय सिंग किंवा ममता बॅनर्जी हे दोन्ही नेते फार काही गांभीर्याने बोलण्यासाठी वा विचार करण्यासाठी ओळखले जात नाही. मात्र, देशाच्या संरक्षणमंत्रिपदी राहिलेल्या शरद पवारांनीही पुराव्यांची, नेमके किती दहशतवादी मारले गेले, याची विचारणा करावी, याला काय म्हणणार? सध्या बारामतीकरांच्या पक्षाच्या जितेंद्र आव्हाडांच्या अर्थपूर्ण मदतीने मुंब्र्याच्या कोपऱ्यात इशरत जहाँ या दहशतवादी मुलीच्या नावाने अ‍ॅम्बुलन्स सुरूच आहे. बालाकोटमधील दहशतवाद्यांची संख्या माहिती करून आव्हाडांप्रमाणेच भविष्यात काही योजना राबविण्याचे पवारांच्या मनात घोळत तर नाही ना, हा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो. सोबतच मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा जाणूनबुजून चुकीचा आकडा सांगणारे, आयुष्यभर जातीय राजकारणाच्या आकड्यांची गणिते जुळविण्यात गुरफटलेले शरदराव आज मृत दहशतवाद्यांचा आकडा विचारतात, याचेही नवल वाटते. खरे म्हणजे ममता, दिग्विजय वा पवार कोणीही असो, या सगळ्यांची तडफड सुरू आहे ती आगामी लोकसभेतील मोदींच्या संभाव्य प्रचंड यशामुळे, म्हणूनच ते कुठल्याही थराला जाताना दिसतात. पण केवळ मोदीविरोधासाठी सैन्यदलावर अविश्वास दाखवून कारवाईचे पुरावे मागणाऱ्यांना इथली देशभक्त जनता नक्कीच धडा शिकवेल, याची खात्री वाटते. कारण देशाच्या १२५ कोटी जनतेला सैन्यदलांचे मनोबल खच्ची करणारा नव्हे तर शत्रूला धडकी भरवणारा धुरंधर नेता हवा आहे, आपल्याच कारवाईवर शंका घेणारा नव्हे!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@