गगन सफारीच्या दिशेने...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2019   
Total Views |

 

 
 
 
एकविसाव्या शतकात मानवाला अशक्यप्राय असे काही नाही. मानवाने चंद्रावर ठेवलेले पहिले पाऊल असो किंवा यशस्वी केलेली मंगळयानाची मोहीम, या सर्व गोष्टी अंतराळवीरांनी अनुभवायच्या मग त्याबद्दल माहिती सामान्यांनी ऐकायची, पाहायची आणि कुतूहल म्हणून चर्चा करायची, इतकाच मानवी अंतराळयानांचा विषय आत्तापर्यंत मर्यादित होता मात्र, तंत्रज्ञानाच्या युगात आता अंतराळ पर्यटन ही नवी संकल्पना काही वर्षात उदयाला आली तर आश्चर्य वाटायला नको... निमित्त हेच की, स्पेस एक्स या कंपनीकडून फ्लोरिडा येथील केनेडी अंतराळ केंद्रातर्फे ‘क्र्यू ड्रॅगन’ या अंतराळ यानाची प्रक्षेपण चाचणी यशस्वीरित्या करण्यात आली. मानवाला घेऊन जाणाऱ्या या यानात ‘रिप्ले’ नावाचा एक रोबोट पाठविण्यात आला असला तरीही या यशस्वी चाचणीनंतर ‘स्पेस एक्स’ अंतराळात पर्यटनासाठी या यानाचा विचार करत आहे. यामुळे लवकरच एका व्यावसायिक अंतराळ पर्यटनाचा उगम होण्याची शक्यता आहे.
 

यंदाच्या वर्षात नासाचे दोन अंतराळवीर स्पेस एक्सद्वारे अंतराळात पाठविण्यात येणार आहेत. ‘स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन’ म्हणजे ‘स्पेस एक्स’ ही अंतराळयान निर्माता कंपनी असून अंतरिक्ष परिवहन सेवा देते. स्पेक्सएक्सद्वारे ‘क्र्यू ड्रॅगन’ विकसित करण्यात आला. मानवासहित उडणाऱ्या या यानाच्या निर्मितीची चाचणी करण्यात कंपनी यशस्वी ठरली आहेरविवारी मध्यरात्री २ वाजून ४५ मिनिटांनी कॅनडी अंतराळ केंद्रातून याचे यशस्वी प्रक्षेपण झाले. अकरा मिनिटांनी या यानापासून रॉकेट वेगळे झाले. रविवार, ३ मार्च रोजी अंतराळात पोहोचून पुन्हा हे यान शुक्रवार, ८ मार्च रोजी पुन्हा पृथ्वीवर येणार आहे.

 

बॉलीवूड कलाकार सुशांत सिंह राजपूत आणि शाहरुख खान यांच्या मालकीच्या चंद्रावर जमिनी असल्याचे प्रमाणपत्र लूनार रजिस्ट्रेशन नामक संस्थेने दिल्याचे वृत्त आले. शाहरुख खान याला त्याच्या चाहतीने दरवर्षी एक एकर जमीन वाढदिवसाला देण्याचा संकल्प केला होता. मानवाला पृथ्वी वगळता अन्य कोणत्याही ग्रहावरील जमिनीवर अशाप्रकारे मालकी हक्क दाखवता येत नसल्याचे अनेक आंतरराष्ट्रीय कायदेविषयक संस्था सांगतात. त्यामुळे प्रत्यक्षात अशारितीने चंद्रावर कुणाची मालकी राहू शकत नाही, असे जरी असले तरीही अंतराळातील प्रवासासाठी पाठविण्यात आलेले यान सध्या कुतूहलाचा विषय आहे. सध्या हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर सुरू असला तरीही भविष्यात अंतराळ सफरीसाठी हा पहिला टप्पा असल्याचे मत या कंपनीचे संस्थापक इलियोन मस्क यांनी म्हटलेतंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी व्यावसायिक, अशी ओळख इलियोन मस्क यांची असल्याने त्यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जाते. वीजेवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करणाऱ्या टेस्ला कंपनीचे सहसंस्थापक मस्क यांची कल्पकता, गुंतवणूक करण्याची क्षमता आणि व्यावसायिक दृष्टीकोन पाहता अंतराळात सर्वसामान्य मानवाच्या भरारीचा तो दिवस नक्कीच दूर नाही.

 

मानवी अंतराळ यानात चाचणीसाठी ठेवण्यात आलेल्या यंत्रमानवालाही विशेष पद्धतीने तयार करण्यात आले आहे. पहिल्या चाचणीत थेट मानवाला पाठविण्यापेक्षा मानवाच्या संवेदना समजू शकणाऱ्या यंत्रमानवाची निर्मिती या यानासाठी करण्यात आली आहे. यंत्रमानवात बसविण्यात आलेल्या यंत्रणेद्वारे त्यावर पडणारा तणाव, खर्च होणारी शक्ती आदींची माहिती गोळा केली जाणार आहे‘रिल्पे’ नावाचा हा यंत्रमानव एका इंग्रजी चित्रपटातील परग्रहवासीयाच्या पात्रापासून प्रेरणा घेऊन बनविण्यात आला आहे. गेल्या १७ वर्षांतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. इलियॉन यांनी ही कंपनी सुरू करताना मानवाला अंतराळात पोहोचविण्यासाठीच आम्ही यानांची निर्मिती करू, असे ध्येय समोर ठेवले होते. या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी १७ वर्षे खर्च केली. सद्यस्थितीला ‘नासा’साठी यान बनवणारी कंपनी व्यावसायिक पातळीवर अशी अंतराळयान बनविण्याच्या ध्येयाला पाहूनच व्यवसाय करू पाहत आहे. मानवी शरीराला अनुकूल अशा या यानाची निर्मिती करताना बरीच काळजीही घेण्यात आली आहे. यान पृथ्वीच्या परिघात जाताना अनुचित घटना घडली तर पृथ्वीवर परतण्यासाठी ४ पॅराशूटही देण्यात आली आहेत. तूर्त साऱ्या अंतराळप्रेमींचे लक्ष केनेडी स्पेस सेंटर येथून उड्डाण केलेल्या ‘क्र्यू ड्रॅगन’च्या परतीच्या प्रवासाकडे लागले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@