भाजपतर्फे माढा लोकसभेसाठी रणजितसिंह नाईक-निंबाळकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2019
Total Views |



मुंबई : युती आणि आघाडासाठी प्रतिष्ठेची आणि चर्चेचा ठरलेल्या माढा मतदार संघातून आता भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाकडून माढा लोकसभा मतदारसंघासाठी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपामध्ये दाखल झालेले रणजितसिंह मोहिते-पाटलांना डावलण्यात आल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. रणजितसिंह मोहिते-पाटलांचे वडील विजयसिंह मोहिते-पाटील हे माढा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये करमाळा
, सांगोला, माढा, माळशिरस या तालुक्यांसह पंढरपूर तालुक्यातील काही भागांचा समावेश आहे.



सातारा जिल्ह्यात उत्तर-पूर्व भागांतच रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मोठा जनाधार आहे. त्यामुळेच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे खासदार आणि माढ्यातील मातब्बर नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर भाजपानं काँग्रेसला मोठा धक्का दिला. दोन महिन्यांपूर्वीच काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतलेल्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. तेव्हा त्यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
 

मोहिते-पाटीलांचा मान

 

राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह यांनी यापूर्वी भाजपात प्रवेश केला होता. तेव्हा त्यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. रणजितसिंह यांच्या पक्षप्रवेशावेळी मोहिते-पाटील कुटुंबाचा मान राखला जाईल, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी तसे संकेत दिले होते. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचा संजय शिंदेंशी थेट सामना होणार असल्याने चुरशीची लढत रंगणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@