जम्मू काश्मिरमध्ये ६ अतिरेक्यांना कंठस्थान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2019
Total Views |




श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी शुक्रवारी पहाटेपासून चकमक सुरू आहे. चकमकीदरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. जम्मू-काश्मीरमधील गेल्या चोवीस तासांतील ही तिसरी चकमक आहे. गुरुवारी शोपिया आणि हंदवाडामध्ये झालेल्या चकमकीत चार अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले तर आठवडाभरातच सुरक्षा दलाने डझनभर अतिरेक्यांना ठार केलं आहे.

दरम्यान आज पहाटे झालेल्या चकमकीत चार भारतीय जवान जखमी झाले, एका जवानाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणीँ दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर रात्रभर शोधमोहिम सुरू होती. सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत.


सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये बडगामच्या सुत्सू गावात शुक्रवारी चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@