मतांसाठी कॉंग्रेसकडून हिंदूंचा अपमान : अरुण जेटली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2019
Total Views |




नवी दिल्ली : काँग्रेस जाणूनबुजून हिंदू दहशतवाद असा शब्द रुजवत असल्याचा आणि मतांसाठी हिंदू दहशतवादाची संकल्पना मांडत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते अरुण जेटली यांनी काँग्रेसवर केला. समझोता बॉम्बस्फोट प्रकरणी स्वामी असीमानंद आणि इतर तीन आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले यावरुन भाजपाने प्रथमच प्रतिक्रीया दिली. 

अरुण जेटली म्हणाले की, हिंदू दहशतवाद हे काँग्रेसने रचलेले षडयंत्र आहे. याचा वापर आपल्या फायद्यासाठी कॉंग्रेसने करून घेतला असल्याचेही ते म्हणाले. हिंदू दहशतवाद शब्दाचा वापर करुन हिंदू समाजाची प्रतिमा खराब करण्याचे काम काँग्रेस करत आहे. कोणतेही ठोस पुरावे नसताना युपीए सरकारने या प्रकरणासाठी विलंब लावला. जे खरे आरोपी होते त्यांना शिक्षा मिळाली नाही. सामान्यांचे जीव गेले. याची जबाबदारी युपीएने आणि काँग्रेसने घ्यायला हवी, असा हल्ला त्यांनी कॉंग्रेसवर चढवला.

हिंदू दहशत ही थेअरी बनविण्यासाठी चुकीच्या माणसांना पकडण्यात आले आहे. सुनावणीच्यावेळी विविध तर्क सुचवले गेले, असा दावाही जेटली यांनी केला. भारत-पाक यांच्यात चालणारी समझोता एक्सप्रेसमध्ये १८ फेब्रुवारी २००७ मध्ये हरयाणातील पानीपत स्थानकानजीक स्फोट झाला. हा स्फोट झाला ते ठिकाण भारताच्या हद्दीतील शेवटचे स्थानक होते. या स्फोटात ६८ लोकांचा मृत्यू झाला.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@