पुणे काँग्रेसचा तिढा सुटेना, उमेदवार मिळेना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2019
Total Views |



पुणे : राज्यातील सांस्कृतिक केंद्र व विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या शहरासाठी अर्थात, पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून अद्यापही उमेदवार घोषित न झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमधील चलबिचल वाढली आहे. दुसरीकडे, भाजपने येथून पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीश बापट यांना मैदानात उतरवले आहे व त्यांनी प्रचाराला धुमधडाक्यात सुरूवातही केली आहे.

 

पुण्याचे विद्यमान भाजप खासदार अनिल शिरोळे हेही बापटांच्या प्रचारात हिरीरीने उतरल्याने पुण्यात भाजपचे पारडे भलतेच जड झाले आहे. अशात काँग्रेसकडून अजूनही उमेदवारच न जाहीर झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. येथील उमेदवारीसाठी २०१४चे काँग्रेस उमेदवार व पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम, पुणे काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते मोहन जोशी, अभय छाजेड इ. नावांची काँग्रेसमध्ये चर्चा आहे. तसेच, येथून संभाजी ब्रिगेडचे एकेकाळचे नेते व सध्या शेकापमध्ये असलेल्या प्रवीण गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारीचीही चर्चा होती. तथापि, गायकवाड यांनीच आपण माघार घेतल्याचे जाहीर केले. काँग्रेसच्या या विलंबाचे उलटसुलट अर्थ काढले जात असून दुसरीकडे हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात येणार असल्याच्या वृत्तांमुळे पुण्यातील काँग्रेस कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.

 

पुण्यात काँग्रेसकडून तर ईशान्य मुंबईत भाजपकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. येथील विद्यमान भाजप खासदार किरीट सोमैय्या यांना शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे भाजपकडून येथे कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@