उर्मिला मातोंडकर विरूद्ध गोपाळ शेट्टी, कॉंग्रेसकडून उमेदवारी जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2019
Total Views |




मुंबई : लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना अखेर पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्या मुंबई उत्तर मतदारसंघातून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टींविरोधात उभ्या राहणार आहेत.

 

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला, मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकरने बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यापूर्वी त्यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी आपण निवडणूकीसाठी कॉंग्रेस प्रवेश करत नसल्याचे म्हटले होते. मात्र, मातोंडकर यांना भाजप खासदार गोपाळ शेट्टींविरोधात तिकीट दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, अखेर आज कॉंग्रेसकडून त्यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@