आयआयटी फेल, पण गुगलकडून १.२ कोटींचे पॅकेज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2019
Total Views |


 


मुंबई : अवघ्या २१ वर्षांच्या आयआयटी परीक्षा अनुत्तीर्ण झालेल्या तरुणाला गुगलकडून १.२ कोटींचे पॅकेज मिळाले आहे. अब्दुल्ला खान असे या तरुणाचे नाव आहे. अब्दुल्ला खान सप्टेंबरमध्ये लंडमधील ऑफिसमध्ये कामावर रूजू होणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रोग्रामिंग साईटवर प्रोफाईल पाहून त्याला गुगलने मुलाखतीसाठी बोलवून घेतले. ऑनलाईन मुलाखतींचे टप्पे हुशारीने पार केले. अंतिम मुलाखतीत अब्दुल्ला उत्तीर्ण झाला आहे. त्याला आता गुगलकडून वर्षाला १.२ कोटींचे वेतन मिळणार आहे.

 

अब्दुल्लाचे आयाआयटीत जाण्याचे स्वप्न होते. मात्र आयआयटीच्या परीक्षेत तो अनुतीर्ण झाला. त्याने मीरा रोड येथील श्री. एल. तीवारी इंजिनीअरिंग कॉलेजमधून त्याने संगणक शास्त्रामध्ये शिक्षण घेतले. नोव्हेंबर २०१८ रोजी गुगलकडून त्याला एक मेल आला आणि एका मेलने अब्दुल्लाचे नशीब बदलून टाकले.

 

"मी एका स्पर्धेत सहभागी झालो होतो. गुगलसारख्या कंपन्या अशा स्पर्धेत उतरणाऱ्या प्रोग्रॅमरच्या प्रोफाईलवर लक्ष ठेऊन असतात. त्यानंतर मला एक दिवस अचानक मुलाखतीसाठी गुगलकडून मेल आला. मी मुलाखत देत गेलो. गुगलकडून अशी ऑफर येईल असे कधीच वाटले नव्हते. मी गुगलसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. त्यांनी दिलेली संधी खूप मोठी आहे. हा अनुभव माझ्यासाठी महत्त्वाचा असणार आहे." अशा भावना त्याने व्यक्त केल्या.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@