पुलवामा हल्ल्यातील संशयिताला पुण्यातून अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2019
Total Views |



चाकण : पुलवामा हल्ल्यानंतर सीआरपीएफ जवानांच्या बदलीच्या सविस्तर पत्रकांची माहिती जवळ बाळगणाऱ्या दहशतवाद्यांच्या साथीदाराला चाकण परिसरातून बिहार एटीएसने अटक केली. शरीयत मंडलस, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. बिहारच्या पाटणा जंक्शन येथे एटीएसने खैरूल मंडल आणि अबू सुलतान या दोन बांगलादेशींना काही दिवसांपूर्वी अटक केली होती. चौकशीत शरियतचे नाव उघडकीस आले आहे. त्यानंतर बिहार एटीएसने पुणे एटीएसच्या मदतीने चाकण पट्ट्यात छापा मारून शरियत याला अटक केली.


पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. खैरूल मंडल व अबू सुलतान या दोघांकडे सीआरपीएफ जवानांच्या पोस्टिंग डिटेल्सची प्रिंट आढळून आली. इतर अनेक महत्त्वाची कागतपत्रे आढळली आहेत. खैरूल मंडल आणि अबू सुलतान या दोघांच्या चौकशीत शरियत याचे नाव पुढे आले. हे तिघे जण इस्लामिक स्टेट बांगलादेश आणि आयसिससह जमीयत-उल-मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे सक्रीय सदस्य आहेत.


काही दिवसांपूर्वी दिल्ली, मुंबई आणि गोव्यात दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट दहशतवादी संघटनांनी आखला होता, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई, दिल्ली आणि गोव्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. दिल्ली, मुंबई आणि गोव्यातील धर्मस्थळांवर दहशतवादी हल्ला करण्याचा दहशतवादी संघटनांचा कट असल्याने त्यासंबंधित कडक सूचना संबधितांना देण्यात आला आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@