पंतप्रधान मोदींची पहिली प्रचार सभा; विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2019
Total Views |



 

मेरठ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेरठ येथून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. एरवी विरोधकांच्या आरोपाला प्रतिउत्तर न देणाऱ्या मोदींनी आजच्या विजय संकल्प रॅलीमध्ये विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी यांच्या न्याय योजनेवर, एअर स्ट्राइकचा पुरावा मागणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. गेल्या ५० वर्षात ज्यांनी गरिबांची बँकेत खाती उघडली नाहीत, ते गरिबांच्या खात्यात पैसे काय जमा करतील? असा राहुल गांधी यांना अप्रत्यक्ष टोला त्यांनी यावेळी लगावला.

 
 सतराव्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आपल्या पहिल्याच जाहीर प्रचार सभेत मोदींनी राहुल गांधींच्या न्याय योजनेवर सर्जिकल स्ट्राईक केले. जे गरिबांचे बँक खाते सुरु करु शकले नाही ते त्यात पैसे काय टाकणार, असा टोला त्यांनी लगावला. मी लहान होतो तेव्हा गरिबी हटावचा नारा ऐकला, मोठा झालो तेव्हाही इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा नारा दिला. आताही तिच घोषणा ऐकली, मात्र देशातील गरीबी हटली नाही. यांच्या धोरणामुळे गरीब आणखीनच गरीब होत गेला, त्यामुळे अशा लोकांपासून देशातील नागरिकांनी दूर राहिले पाहिजे.
 
 
मोदींनी भाजप सरकारच्या कार्यकाळातील विकासकामांचा लेखाजोखा मांडला. भाजप सरकारच्या काळात देशात आमूलाग्र बदल झाल्याचे त्यांनी सांगितले. मी कोणत्याही प्रकारचे ओझे घेऊन चालत नाही. माझ्याजवळ स्वतःच असं काहीच नाही. जे काही आहे ते या देशाने दिलेले आहे. जे या देशाने दिले, जेवढे दिले तेवढे माझ्यासाठी भरपूर आहे. यामुळे माझ्यासाठी राष्ट्र प्रथम असते. देश कमजोर असेल, समाज गटागटात विभागलेला असेल तेव्हाच विरोधकांची राजकीय पोळी भाजते. विरोधक स्वतःच्या घराचा प्रथम विचार करतात, देशाचा आणि समाजाचा नाही. म्हणूनच अशा राजकारण्यांपासून वेळीच सावध व्हा, असा हल्लाबोल त्यांनी विरोधकांवर केला. यासोबतच एअर स्ट्राईकवर पुरावा मागणाऱ्यांवर मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@