आई करायची मोलमजुरी; मुलाने मारली एमपीएससीत बाजी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2019
Total Views |


 


ललित जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या जव्हार वाचनालयाचा प्रमुख होता

 

जव्हार : महाराष्ट्र राज्य सेवा आयोग परीक्षेचे (एमपीएससी) नुकतेच निकाल जाहीर झाले आहेत. या निकालात जिजाऊ संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या जव्हार वाचनालयाचा प्रमुख असलेला ललित मौळे याची राज्य कर निरीक्षकपदी निवड झाली. विशेष म्हणजे, ललितने एकाच वर्षात तीन परीक्षा उत्तीर्ण होण्याची किमया साधली आहे. आपल्या या यशात कुटुंबासोबतच निलेश सांबरे व जिजाऊ संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभल्याची भावना ललितने व्यक्त केली.

 

ललित हा ग्रामीण भागातील असून लहान असतानाच त्यांच्यावरून वडिलांचे छत्र हरपले होते. गरीब कुटुंबातील असल्याने त्याच्या आईने मोलमजुरी करून त्यांचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यामुळे ललितने अतिशय खडतर परिस्थितीमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल संपूर्ण जव्हार तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. त्याच्या या निवडीबद्दल जिजाऊ संस्थेने त्याचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्याने, जिजाऊ संस्थेचे आभार मानले. संस्थेने व सांबरे यांनी अभ्यासाकरीता सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळेच हे यश मिळवू शकलो अशी भावना त्याने व्यक्त केली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@