'मिशन शक्ती'मुळे अमेरिका चिंतेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2019
Total Views |



वॉशिंग्टन अंतराळातील कृत्रिम उपग्रह पाडणार्‍या क्षेपणास्त्र (ए-सॅट) चाचणीच्या यशानंतर आता यावर अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. मिशन शक्तीद्वारे तिनशे किमी अंतरावरील उपग्रह टीपत जगात अशी कामगीरी करणाऱ्या देशांमध्ये जाऊन बसला, अशी क्षमता असणारा भारत चौथा देश आहे.

 

दरम्यान, भारताच्या या मिशन शक्तीची दखल अमेरिकेने घेतली. मात्र, भारताने पाडलेल्या उपग्रहाच्या अंतराळातील अवशेषाचा मुद्दा उपस्थित करत त्यावर अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. ''अंतराळातील कृत्रिम उपग्रह पाडणार्‍या क्षेपणास्त्राची (ए-सॅट) यशस्वी चाचणी घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण आम्ही पाहिले आहे.'', असे अमेरिकेने निवेदनात म्हटले आहे.

 

भारत आणि अमेरिका हे अंतराळ क्षेत्रात शास्त्रज्ञ व तांत्रिक क्षेत्रात सहकार्य कायम राहणार आहे, मात्र, मात्र, आम्ही अंतराळातील अवशेषाबद्दल चिंतीत आहोत, असे अमेरिकेन प्रवक्त्यांचे म्हटले. अंतराळातील उपग्रहाचे अवशेष ही अमेरिकेसाठी चिंतेची बाब आहे. आम्ही भारताच्या मोहिमेची दखल घेतली आहे, असे अमेरिकेने नमूद केले आहे.

 

काही दिवसांत अवशेष पृथ्वीवर

भारताने मिशन शक्तीच्या ए सॅटची चाचणी पृथ्वीच्या कक्षेतील जवळच्या भागात घेतली. त्यामुळे नष्ट केलेल्या उपग्रहाचे अवशेष अंतराळात राहणार नाहीत. ते पृथ्वीवर आठवड्याभरात पडतील, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारताकडून स्पष्ट केले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@