आपचे खासदार हरिंदर सिंह खालसा यांचा भाजप प्रवेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2019
Total Views |



नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये आयारामांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक दिग्गज नेते भाजपात प्रवेशासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. आम आदमी पार्टीचे खासदार आणि अरविंद केजरीवाल यांचे समर्थक हरिंदर सिंह खालसा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत खालसा यांचा पक्षप्रवेश पार पडला. खालसा हे पंजाब राज्यातील फतेहगढ साहिब या लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत.

 

आपण कोणत्याही अटीशर्ती शिवाय भाजप प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच देशाला पुढे नेऊ शकते. नरेंद्र मोदी यांचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे. याचमुळे मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हरिंदर सिंह हे अरविंद केजरीवाल आणि पक्षावर नाराज होते. आम आदमी पक्षाने त्यांना बडतर्फ केले होते. खालसा हे १९७४ च्या बॅचमधील ते आयएफएस अधिकारी असून नार्वेमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम करत होते. १९८४ साली झालेल्या सिखविरोधी दंगलीच्या निषेधार्थ त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. यापूर्वी त्यांचं कुटुंब अकाली दलाशी जोडलेले गेले होते. त्यांचे वडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जवळचे सहकारी होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@