'मिशन शक्ती' मोदींच्या सल्ल्यानेच; डीआरडीओ प्रमुखांचा खुलासा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2019
Total Views |



 


नवी दिल्ली : 'मिशन शक्ती'विषयी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) प्रमुख जी सतीश रेड्डी यांनी महत्वपूर्ण खुलासा केला आहे. मिशन शक्ती ही मोहीम आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून पार पडली असून यावर मागील दोनवर्षापासून काम चालू होते. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला. या मोहिमेसाठी तब्बल १०० शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत घेत होते, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

अंतराळात हेरगिरी करणारे उपग्रह भारताने 'ए-सॅटया क्षेपणास्त्रने उध्वस्त केल्याची माहिती बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधताना दिली. 'मिशन शक्ती' ही मोहीम डीआरडीओच्या शास्रज्ञानी यशस्वीरीत्या पार पाडून देशाला अंतरिक्ष महासत्ता बनविल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या संबोधानंतर त्यांच्यावर नेहमीप्रमाणे विरोधकांनी राजकारण करायाला सुरुवात करून टीका केली. त्यामुळे रेड्डी यांचा खुलासा अतिशय महत्वपूर्ण ठरतो.

 

रेड्डी यांनी सांगितले की, "राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या देखरेखीखाली आम्ही काम करत होतो. या मिशनसाठी त्यांनीच आम्हाला सहमती दिली त्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार आम्ही ही मोहीम फत्ते केली. डोवाल यांच्या निर्णयांना पंतप्रधानांची संमती होती. त्यामुळे त्यांच्या निर्देशानुसार आम्ही मोहीम पार पाडली. दोन वर्षांपूर्वी या मोहिमेवर काम सुरु करण्यात आले. तर मागील सहा महिन्यापासून आम्ही मिशन मोडवर होतो." रेड्डी यांच्या या खुलास्याने विरोधक तोंडावर पडल्याची चर्चा होत आहे, अशी माहिती एका भाजप नेत्याने दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@