१ एप्रिलपूर्वी उरकून घ्या ही कामे : 'हे' होणार बदल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2019
Total Views |




नवी दिल्ली : १ एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष लागू होणार आहे. त्यानुसार प्रशासकीय आणि दैनंदिन आयुष्यात मोठे बदल होणार आहेत, त्याचा सरळ परिणाम तुमच्या पगारावर होऊ शकतो. जाणून घेऊयात नेमके या दिवसांत काय बदल होणार आहेत आणि आपल्याला कोणती कामे लवकर उरकली पाहीजेत. दरम्यान, ३१ मार्च रोजी रविवार (सुट्टी) असल्याने ही कामे ३० मार्चपर्यंत उरकायला हवीत.




पॅनकार्ड होणार रद्द
?

 

तुम्ही जर तुमच्या पॅनकार्डशी आधार क्रमांक लिंक केला नसेल, तर तुमचे पॅनकार्ड ३१ मार्चपूर्वी बंद होईल. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, रद्द झालेल्या पॅनकार्डद्वारे आयटीआर करता येणार नाही. बॅंकेचे व्यवहार करताना त्यामुळे अडचणी येऊ शकतात.




टिव्ही डीटीएच कनेक्शन होणार बंद ?

 

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या नियमांनुसार आता तुम्हाला तुम्ही पाहत असलेल्या चॅनल्स निवडून त्याच चॅनल्सचे पैसे भरायचे आहेत. किमान भाडे १२० रुपये आणि त्यावरील चॅनल्ससाठी त्यानुसार पैसे भरावे लागतील. त्यासाठी तुमच्या केबल ओपरेटरशी संपर्क साधा अन्यथा टीव्ही डीटीएच कनेक्शन बंद होईल.



 

आयकर परताना भरणा करण्याची शेवटची तारीख

३१ मार्चपूर्वी तुम्हाला २०१८-१९ या वर्षासाठी तुमच्या उत्पन्नावरील आयकर भरावा लागणार आहे. ही तारीख चुकवल्यास तुम्हाला दहा हजारापर्यंतचा दंड भरावा लागेल. पाच लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना दंडाची रक्कम हजार रुपयांपर्यंत आहे. २०१८-१९ या वर्षासाठी करभरणा करताना झालेल्या चुका सुधारण्यासाठी ही शेवटची संधी आहे. 

आयकर नियमावलीत बदल

केंद्र सरकारने केलेल्या नव्या घोषणेनुसार आता पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. बॅंकेतील ४० हजारांपर्यंतच्या रक्कमेच्या व्याजावर कोणताही कर लागू होणार नाही. भाडे आकारणीवर टीडीएसची मर्यादा अडीच लाखांपर्यंत करण्यात आली आहे.





जीएसटी परतावा

 

व्यापाऱ्यांसाठी जीएसटी भरणा करणाऱ्यांना ३१ मार्च ही शेवटची तारीख आहे. आत्तापर्यंत ज्यांनी जीएसटी भरणा केला नाही त्यांना ३१ मार्च ही शेवटची तारीख आहे.




महागाई वाढणार ?

 

१ एप्रिलपासून वाहनांमध्ये वापरला जाणारा सीएनजीही महागणार आहे. पीएनजी गॅसही महागण्याची शक्यता आहे. नैसर्गिक वायूमध्ये १८ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही वाढू शकतात. कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ इंधनदरवाढीला कारणीभूत ठरू शकते.




वाहने महागणार !

 

१ एप्रिलपासून कार घेणे महागणार आहे. टाटा मोटार्स, जॅग्वार लॅण्ड रोवर इंडिया, टोयोटा आदी कंपन्यांनी वाहनांच्या किमती वाढणार असल्याची घोषणा गेल्यावर्षीच केली होती. दरम्यान वाहनांच्या किमतीत २५ हजारांपर्यंत वाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




परवडणारी घरे होणार आणखी स्वस्त

 

१ एप्रिलपासून घर खरेदी करणेही स्वस्त होणार आहे २४ फेब्रुवारी आणि १९ मार्च रोजी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत निर्माणाधीन घरांवरील जीएसटी १ टक्के करण्यात आला आहे. अन्य श्रेणीतील घरांवरील जीएसटी पाच टक्क्यांपर्यंत आणला आहे.




विमा होणार स्वस्त

 

१ एप्रिलपासून विमा घेणे स्वस्त होणार आहे. . याचा फायदा २२ ते ५० वर्षीय व्यक्तींपर्यतच्या वयाच्या व्यक्तींना होणार आहे. १ एप्रिलपासून कंपन्या नव्या मृत्यूदरांच्या आकड्यांचे अवलंबन करणार आहेत. आत्तापर्यंत कंपन्या २००६-०८ ची माहिती वापरत होती आता २०१२-१४ ची आकडेवारी वापरात येणार आहे.




कर्ज होणार स्वस्त

 

१ एप्रिलपासून सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होणार आहेत. रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार बॅंका आता एमसीएलआरऐवजी मध्यवर्ती बॅंकेने जारी केलेल्या रेपो रेटच्या आधारे कर्ज देतील. त्यामुळे सर्व कर्ज स्वस्त होणार आहेत. त्यामुळे ज्या बॅंकांची कर्जे एमसीएलआरनुसार आहेत त्यांचे व्याजदर कमी होतील.



 

ईपीएफओतील बदल

भविष्य निर्वाह निधी संघटन मोठा बदल करू शकते. नव्या नियमावलीनुसार नोकरी बदलल्यानंतर तुमचे पीएफ खाते आपोआप ट्रान्सफर होईल. त्यामुळे नोकरदारांना पीएफ खाते पुढील कंपनीकडे सोपवण्यासाठी अर्ज करत बसण्याची गरज नाही.




 

गाड्यांवर लागणार हाय सिक्युरीटी क्रमांक

वाहन निर्माता कंपन्यांना आता हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) देणे अनिवार्य आहे. या क्रमांकाविना कोणतीही गाडी शोरुमबाहेर येऊ शकत नाही.




 

रेल्वे प्रवाशांसाठी संयुक्त पीएनआर

सध्या विविध रेल्वेगाड्यांद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या नावे दोन पीएनआर क्रमांक लागू होतात. १ एप्रिलपासून तसे न करता विविध रेल्वे प्रवासासाठी एकच पीएनआर जनरेट केला जाणार आहे. या सेवेमुळे पहिली गाडी सुटण्यास उशीर झाला आणि दुसऱ्या गाडीपर्यंत पोहोचता आले नाही तर पुढील गाडीचे तिकीट रद्द करता येऊ शकतो, रिफंड मिळणे शक्य होईल.





वीजमीटर करता येणार रिचार्ज

 

 

१ एप्रिलपासून मोबाईलप्रमाणे वीजमीटर रिचार्ज करता येणार आहे. वीजमीटरवर येणाऱ्या बिलापेक्षा आधीच रक्कम भरता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे तुम्ही जितक्या रक्कमेचे बिल भरले आहे त्या रक्कमेइतकी वीज तुम्ही वापरू शकता.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@