एनडीएला ३७० जागा मिळणार : रामदास आठवले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2019
Total Views |



लखनौ : उत्तर प्रदेशात सपा बसपाला यश मिळणार नाही. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या प्रचारामुळे काँग्रेसचे मतदान वाढेल, त्यामुळे सपा बसपा युतीला फटका बसून भाजपचा उत्तर प्रदेशात विजय होईल, असे सांगत देशभरात भाजप प्रणित एनडीए ३७० जागांवर जिंकणार असून पुन्हा नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात केंद्रात सरकार स्थापन होईल., असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्ष पंधरा जागांवर निवडणूक लढणार असून अन्य ६५ जागांवर भाजपला आरपीआयचा पाठिंबा देणार असल्याची घोषणा रामदास आठवले यांनी केली. यावेळी आरपीआयच्या अधिकृत १५ उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर केली.

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या दोन जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात याव्यात यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ; यूपी भाजप प्रदेश अध्यक्ष महेंद्रनाथ पांडे; तसेच यूपी भाजप चे प्रभारी सुनील बन्सल यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, त्यावर त्यांनी कोणताही प्रस्ताव दिला नाही. त्यामुळे आमच्या नोंदणीकृत पक्षाला काही जागा लोकसभेच्या लढणे आवश्यक असल्याने आम्ही उत्तर प्रदेशात १५ जागा लढत असून अन्य ६५ जागांवर भाजपला पाठिंबा दिला आहे, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मागील
गेल्या वर्षांत चांगले काम केले आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांचे काम केले आहे. सामान्य माणूस मोदींच्या विरुद्ध नाही केवळ काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदींच्या विरुद्ध प्रचार करीत आहे. त्या प्रचाराचा उपयोग होणार नाही. 'आम आदमी' नरेंद्र मोदिंसोबत राहणार आहे. त्यामुळे मागासवर्गीय बहुजनांचे मतदान भाजप एनडीएच्या उमेदवारांना होईल त्यामुळे देशभरात भाजप तिनशे आणि एनडीए एकूण ३७० जागांवर विजयी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील आरपीआयच्या उमेदवारांची यादी

· बीजनोर - सरताज चौधरी

· मेरठ - मोहम्मद मुजीब

· गजियाबद - मोहनलाल

· बरेली -मोहम्मद नदीम इकबाल

· कानपुर नगर - दीपक कुमार सविता

· अकबरपूर -हाजी मोहम्मद शाफिक सिद्दीकी

· फैजाबाद - शाहीन बानो

· केसरगंज - गोरखनाथ दुबे

· डुमारीयगंज - आदित्य कुमार पटेल

· संत कबीर नगर - प्रवेन्द्र कुमार सिंह

· कुशीनगर - राम अचाल यादव

· जौनपूर - भारत राम यादव

· मच्छलिशहर - डॉ ब्राजेश शर्मा

· मिर्जापूर - श्यामधर दुबे

· रोबर्ट्सगंज - इंजिनियर ब्रिजेश कुमार कनोजिया

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat




@@AUTHORINFO_V1@@