मिशन शक्ती; मोदींचा पाकिस्तान आणि चीनला इशारा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : क्षेपणास्त्राद्वारे अंतराळातील उपग्रह पाडण्यात डीआरडीओच्या शास्त्रज्ञांना यश आले. भारतासाठी ही ऐतिहासिक घटना ठरली आहे. अवघ्या तीन मिनिटांत शास्त्रज्ञांनी लो अर्थ ऑर्बिटमध्ये ३०० किलोमीटर उंचीवरील उपग्रह यशस्वीरीत्या पाडला. यामुळे भारताची अंतराळातील सुरक्षा अधीकच भक्कम झाली आहे. लो अर्थ ऑर्बीट म्हणजे एलईओ उपग्रह पाडण्यात यश मिळवून भारताने पाकिस्तान आणि चीनला अप्रत्यक्ष इशाराच दिल्याची एकच चर्चा आहे.

 

एलईओ या प्रकराचे हे उपग्रह हेरगिरीसाठी वापरले जातात. पाकिस्तान आणि भारतमध्ये होणाऱ्या संघर्षात चीन पाकिस्तानच्या पाठीशी उभा असतो. अशावेळी जर युद्धजन्य परस्थिती उद्भवली तर एलओसीवर लक्ष ठेवणाऱ्या चीन व पाकिस्तानच्या सॅटेलाईट भारत नष्ट करू शकतो. अशी माहिती अंतराळ संशोधनाच्या अभ्यासिका स्वाती कुलकर्णी यांनी 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.

 

मिशन शक्तीमागे शास्त्रज्ञांचे यश असले तरी, याला युद्धजन्य परिस्थितीची पार्श्वभूमी आहे. हे क्षेपणास्त्र युद्धात वापरता येणार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तान व प्रामुख्याने चीनला अप्रत्यक्ष इशाराच दिला असल्याची जगभरात चर्चा सुरु झाली आहे. भारताच्या ए-सॅट क्षेपणास्त्राने ही कामगिरी फत्ते केली, अशी कामगिरी करणारा भारत हा रशिया, अमेरिका आणि चीन नंतर चौथा देश ठरला. त्यामुळे भारत अंतरिक्ष युद्धासाठी तयार असल्याचा जगाला इशारा दिला असून प्रामुख्याने चीन आणि पाकिस्तान या दोन देशांना हा इशारा असल्याचे तद्यांचे मत आहे.


मुख्यमंत्र्यांकडून शास्त्रज्ञांसह प्रधानमंत्र्यांचे अभिनंद


मुंबई : भारतीय बनावटीच्याए-सॅटच्या सहाय्याने यशस्वी करण्यात आलेल्या मिशन शक्तीमुळे अंतरिक्ष क्षेत्रात भारताची ताकद वाढल्याचे जागतिक स्तरावर सिद्ध झाले असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोहिमेतील शास्त्रज्ञांचे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.


मुख्यमंत्री म्हणाले, आपल्या सर्वांसाठीए-सॅटची (अँटी सॅटेलाईट) यशस्विता ही आनंदाची घटना असून भारतीय म्हणून माझ्यासाठी ती गौरवाची आहे. मिशन शक्तीमुळे भारताने अंतरिक्ष क्षेत्रात आपली सामरिक ताकद सिद्ध केली आहे. प्रधानमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे युद्धासाठी नव्हे तर देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अशी ताकद निर्माण करणे आवश्यक असते. भारताने यापूर्वी कधीही दुसऱ्यांवर हल्ला केला नाही. या मोहिमेच्या यशस्वीतेमुळे जगातील निवडक देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. अमेरिका व चीनला अशी शक्ती प्राप्त करण्यास बराच काळ लागला. त्या तुलनेत भारतीय वैज्ञानिकांनी ही मोहीम अत्यंत कमी वेळेत पूर्ण केली आहे. शक्तीशाली देशच शांतता प्रस्थापित करू शकतो. त्यामुळे भारताच्या शक्तीला जागतिक स्तरावर वेगळी ओळख प्राप्त होत आहे. येणाऱ्या काळात जगात शांतता प्रस्थापित करण्यात भारताला निश्चितच यश येईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@