सैन्यदलाच्या शौर्याला मानवंदना; मराठी सिनेनाट्य कलाकार एकवटले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2019
Total Views |



 


सैन्यदलाच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी जागते रहोकार्यक्रमाचे आयोजन

 

मुंबई : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मराठी सिनेनाट्य कलाकार एकवटले आहेत. सिनेनाट्य सृष्टीतील काही कलावंत मंडळींनी एकत्र येत सैन्यदलाच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी जागते रहोया कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दूर व मुक्त अध्ययन संस्था मुंबई विद्यापीठप्रणाम भारत कला अभियानयांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. २८ मार्चला सायंकाळी ५.०० वाजता मराठी भाषा भवन, मुंबई विद्यापीठ, कालिना सांताक्रुझ येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

 

हुतात्म्यांप्रती कृतज्ञतेसोबतच आजच्या तरूणाईच्या मनात नेशन फर्स्टम्हणजे नेमके काय व त्याबाबत जागृती निर्माण करणारा हा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमाविषयी बोलताना ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी सांगितले की, "सैन्याची मानसिकता नेमकी कशी असते हे दाखवतानाच प्रत्येकाने आपल्या कर्तव्याबाबत सजग राहणे ही तेवढच गरजेचे आहे. आपल्या छोट्या-छोट्या कृतीतून या गोष्टी आपण अमलात आणू शकतो याची जाणीव उद्याच्या भविष्याला (विद्यार्थ्यांना) करून देण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. तर, यावेळी प्रसिद्ध लेखक अभिराम भडकमकर म्हणाले, "आपले संपूर्ण जगणे व काम आपल्या राष्ट्राशी कशाप्रकारे निगडीत असू शकते? तसेच आपली देशभक्ती केवळ जयघोषापुरती न राहता तिचा सखोल व सजग अर्थ समजून देत विचाराने प्रवृत्त करणारा हा कार्यक्रम असेल असे यांनी यावेळी सांगितले.

 
 
 

आपल्या जीवाची बाजी लावणारे सैनिक आपल्यासाठी खरे सेलिब्रिटी आयकॉनअसायला हवेत, असे मत व्यक्त करतानाच आपल्या तीनही सैन्यदलाची यंत्रणा कशाप्रकारे कार्यरत असते हे विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार असल्याचे निर्माते अनंत पणशीकर यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ.सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये अनुराधाताई गोरे, अनुराधाताई प्रभुदेसाई यांच्या व्याख्यांनाचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार असून एअर मार्शल सुनील सोमण, लेफ्ट.कर्नल गडकरी, व्हॉइस अॅडमिरल अभय कर्वे हे मान्यवर वक्ते सैन्यदलासंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यासोबत सेलिब्रिटी व्हिडिओ, देशभक्तीपर गीतगायन या आणि अशा अनेक कार्यक्रमांचे सादरीकरण यात होणार आहे.

 

या कार्यक्रमाची संकल्पना पद्मश्री वामन केंद्रे, पुरुषोत्तम बेर्डे, प्रमोद पवार, अनंत पणशीकर, जयेंद्र साळगावकर अभिराम भडकमकर, राजन भिसे, संजय पेठे, प्रसाद महाडकर, चंद्रशेखर सांडवे, डॉ. अमोल देशमुख, कुणाल रेगे, अभिषेक मराठे यांची आहे. मार्गदर्शक श्री. दीपक मुकादम (मा. राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन समिती सदस्य, मुंबई विद्यापीठ), डॉ. शेफाली पंड्या (संचालक - दूर व मुक्त अध्ययन संस्था, मुंबई विद्यापीठ) यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@