अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपचे विजयाचे खाते उघडले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2019
Total Views |


 


अरुणाचल प्रदेशमध्ये ६० विधानसभा जागांसाठी ११ एप्रिल रोजी मतदान होणार

 
ईटानगर : २०१९च्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्व पक्ष आपापल्या परीने जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच भारतीय जनता पार्टीला पूर्वोत्तर राज्यातून एक 'गुड न्यूज' मिळाली आहे. अरुणाचल प्रदेश मधील आलो ईस्ट या विधानसभा क्षेत्रातून केंटो जिनी यांनी बिनविरोध निवडणूक जिंकली आहे. केंटो जिनी हे भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात विरोधकांना योग्य उमेदवार न मिळाल्याने त्यांची बिनविरोध विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली.
 

 

अरुणाचल प्रदेशमध्ये ६० विधानसभा जागांसाठी ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २५ मार्च होती. अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेला जिनी यांच्या शिवाय अन्य कोणत्याही उमेदवाराचा अर्ज न आल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. याबाबतची माहिती केंद्रीय गृहराज्य मंत्री किरन रिजिजू यांनी मंगळवारी ट्विट करून दिली. रिजिजू यांनी आपल्या ट्विटमध्ये जिनी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
 
 

अरुणाचल प्रदेशमधून आणखी एक आमदार बिनविरोध निवडून आल्याची माहिती भाजपचे सरचिटणीस व उत्तर-पूर्व भारताचे प्रभारी राम माधव यांनी ट्विटरवरून दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ याचुली विधानसभा मतदारसंघातून ताबा तेदिव यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजप सरकारच्या काळात पूर्वोत्तर राज्याच्या विकासाला गती मिळाल्याने येथील जनता भाजपच्या पाठीशी उभी असल्याचा विश्वास भाजप नेत्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@