अखेर रंगीला गर्लचा काँग्रेसशी घरोबा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2019
Total Views |


 

उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता

 

नवी दिल्ली : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने राहुल गांधी यांच्या उपस्थित काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसापासून उर्मिलाच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा रंगवल्या जात होत्या. आज अखेर नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात तिचा काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश पक्ष प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर उर्मिलाला उत्तर मुंबईतून निवडणूकीची उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

उर्मिलाच्या काँग्रेस पक्ष प्रवेशावेळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्र अध्यक्ष मिलिंद देवरा, संजय निरुपम व महाराष्ट्रातील इतर नेते उपस्थित होते. यावेळी उर्मिलाने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. ती म्हणाली, "सर्वांना सोबत घेऊन जाईल, सर्वाना न्याय देईल अशा नेत्याची आपल्याला गरज आहे. साधायचा घडीला हे फक्त राहुल गांधीच करून शकतात. आम्हाला त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे."

 

राहुल गांधी यांनी उर्मिलाला काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन केले. दरम्यान, उर्मिलासोबत उत्तर मुंबईतील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांचे तगडे आव्हान असणार आहे. त्यामुळे उर्मिला शेट्टी यांच्याविरोधात किती तग धरू शकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@