अभिनंदन जाणार सुट्टीवर पण...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2019
Total Views |



नवी दिल्ली : आपल्या शौर्याने भारतीय लष्कराचे नाव उंचावणारे विंग कमांडर अभिनंदन यांची उपचारानंतर आता तब्येत सुधारली आहे. दिल्लीतल्या लष्करी हॉस्पिटलमध्ये गेले महिनाभर त्यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारानंतर त्यांना चार आठवड्यांची सुट्टी मिळाली आहे. परंतु, या सुट्टीत कुटुंबियांसोबत वेळ न घालवता सरळ श्रीनगरमधील टीमसोबत वेळ घालवणे त्यांनी पसंत केले आहे. यावरून त्यांची तत्परता आणि राष्ट्रावरच्या प्रेमाची पावती मिळते.

 

पाकिस्तानातून परतल्यानंतर लष्कराच्या नियमांप्रमाणे त्याची चौकशी झाली आणि उपचार करण्यात आले. चेन्नईला त्याचे आई वडिल आणि पत्नी राहते. ही सुट्टी तो त्यांच्यासोबत राहून घालवू शकले असते. पण त्यांनी पुन्हा श्रीनगरला जाण्याचा निर्णय घेतलाय. ते आपल्या स्कॉड्रनमध्ये परतणार असून सहकारी मित्रांसोबतच राहण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला आहे.

 

दरम्‍यान, अभिनंदन यांना विमान उडविण्यासाठी फीट आहेत का? हे तपासण्यासाठी दिल्‍लीला जावे लागणार आहे. यानंतरच त्‍यांना विमान उडविण्याची परवानगी मिळणार आहे. गेल्‍या महिन्यातील २७ फेब्रुवारीला भारतीय सीमेत घुसलेल्‍या पाकिस्‍तानच्या विमानांना पिटाळून लावण्यात अभिनंदन यांचा महत्‍वाचा वाटा होता. यावेळी त्‍यांनी पाकिस्‍तानच्या एका फायटर विमानालाही पाडले. या दरम्‍यान त्‍यांचे विमान क्रॅश झाल्‍याने पॅराशूटच्या सहाय्याने ते पाकिस्‍तानच्या हद्‍दीत उतरले. यावेळी पाकच्या नागरिकांनी त्‍यांना मारहाणही केली. या सर्व घडामोडींनतर ते पुन्हा सुखरूप भारतात पोहचले होते. त्‍यांच्या या धाडसाचे देशभरात कौतुक करण्यात आले होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@