सोशल मीडियाबाबत आम्हीच योग्य निर्णय घेऊ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2019
Total Views |




मुंबई : सोशल मीडियावर अंकुश ठेवण्यासाठी नियमावली नाही. त्यामुळे आम्हीच योग्य तो निर्णय घेऊ अशा शब्दात केंद्रीय निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयाने फटकारले आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करताना निवडणूक आयोग सोशल मीडियावर देखील लक्ष ठेवणार असून त्याच्या खर्चाचा तपशील देखील निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले होते.

 

काही तक्रारी असल्यास त्या ऑनलाईन दाखल करता येणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. दरम्यान, सोशल मीडियावर अंकुश ठेवण्यास निवडणूक आयोगाकडे नियमावली नसल्याचे सांगत आता मुंबई उच्चं न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला फटकारले आहे. शिवाय, आम्हीच काय तो निर्णय घेऊ असेदेखील म्हटले आहे.

 

आगामी निवडणुकांचा काळ लक्षात घेता आचारसंहितेच्या काळात मतदानाच्या ४८ तास आधी सर्व समाजमाध्यमांसाठी नियम अधिक काटेकोरपणे राबवले जातील. तसेच मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिकाकर्ते, गुगल, फेसबुक, ट्विटर, युट्यूब यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांचाही विचार केला जाईल अशी लेखी हमी राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने अॅड. प्रदिप राजागोपाल यांनी न्यायालयात दिली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@