अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2019
Total Views |



नवी दिल्ली : समाजवादी पार्टीच्या माजी खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात जयाप्रदा यांचा भाजप प्रवेश झाला. जयाप्रदा या उत्तर प्रदेशातील रामपूर येथून दोनदा लोकसभा निवडून आल्या आहेत. अमर सिंह आणि आजम खान यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी समाजवादीला सोडचिट्ठी दिली होती.

 

भाजप प्रवेशानंतर जयाप्रदा यांना रामपूर येथून लोकसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असल्याचे त्यांनी प्रवेशावेळी सांगितले. दरम्यान, जयाप्रदा या २०१४ मध्ये आरएलडीमध्ये प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी बिजनौरमधून निवडणूकही लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@