पाकिस्तानची झोप उडाली; चिनुक हेलिकॉप्टर वायुसेनेत दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2019
Total Views |



चंदीगड : पाकिस्तानची झोप उडविणारे अमेरिकन बनावटीचे CH-47F (I) चिनुक हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर भारतीय वायुसेनेत दाखल झाले आहे. चंदीगड येथील वायुसेनेच्या १२ व्या एयरफोर्स स्टेशनवर एका कार्यक्रमात चिनुकचे राष्ट्रार्पण करण्यात आले. यावेळी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ हे उपस्थित होते. चिनुकच्या समावेशाने वायुसेनेच्या ताकतीत वाढ झाली आहे.

 

अमेरिकेने चिनुकच्या मदतीनेच दहशतवादी ओसामा बिन लादेनचा पाकिस्तानात घुसून खात्मा केला होता. आता हीच हेलिकॉप्टर भारतीय वायुसेनेत दाखल झाल्याने पाकिस्तानची झोप उडाली आहे. पहिल्या टप्प्यात चार चिनुक हेलिकॉप्टर वायुसेनेत दाखल झाले आहेत, तर अमेरिकेशी झालेल्या करारानुसार भारताला अशी एकूण १५ हेलिकॉपटर्स मिळणार आहेत.

 

या हेलिकॉप्टरचा वापर मुख्यत्वे सैन्याच्या पथकांना एका जागेवरुन दुसऱ्या जागी वाहून नेण्यासाठी तसेच सेनेचे साहित्य वाहून नेण्यासाठी केला जाणार असल्याचे एअर चीफ मार्शल धनोआ यांनी सांगितले. जगभरातील १९ देशाच्या वायुसेनेमध्ये चिनुकचा वापर केला जात असून चिनुक ही देशाची राष्ट्रीय संपत्ती असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@