रणसंग्राम लोकसभेचा : जोरदार शक्तीप्रदर्शन करत गडकरींनी भरला अर्ज, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2019
Total Views |




नागपूर : लोकसभा निवडणुक २०१९ च्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्व उमेदवारांनी मुहूर्तावर आपले अर्ज भरण्याची सुरुवात केली आहे. नागपूरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत नितीन गडकरी यांनी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती. भारतीय जनता पक्षापुढे उभी असलेली मतदारांची ताकद पाहता पुन्हा गडकरीच लोकसभेवर निवडून येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 


दरम्यान अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अभिनेते राज बब्बर आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासह केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अनेक दिग्गज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. २३ मे रोजी निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी २० राज्यांतील ९१ जागांवर मतदान होणार असून त्यासाठी आज अर्ज भरण्याचा २५ मार्च हा शेवटचा दिवस आहे.
 

पहिल्या टप्प्यात नागपूरमधून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, सोलापूरमधून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, नांदेडमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, अमरावतीतून शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ, यवतमाळमधून भावना गवळी, अकोल्यातून भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे, बीडमधून प्रीतम मुंडे, मथुरामधून भाजप खासदार हेमा मालिनी, नागपूरमधून काँग्रेसचे नेते नाना पटोले, गाझियाबादमधून व्ही.के. सिंह आणि काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर हे फतेहपूर सिक्री येथून अर्ज भरणार आहेत, दरम्यान जोरदार  शक्तीप्रदर्शन करत सर्व उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.

 

पहिल्या टप्प्यात 'या' ठिकाणी मतदान

राज्य           जागा

आंध्रप्रदेश          २५

अरुणाचल प्रदेश     २

आसाम             ५

बिहार              ४

छत्तीसगड          १

जम्मू-काश्मीर        २

महाराष्ट्र             ७

मणिपूर             १

मेघालय             २

मिझोराम            १

नागालँड             १

ओडिशा              ४

सिक्कीम             १

तेलंगणा            १७

त्रिपुरा                १

उत्तर प्रदेश           ८

उत्तराखंड              ५

पश्चिम बंगाल          २

अंदमान निकोबार       १

लक्षद्वीप               १

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@