'छपाक'चा फर्स्ट लूक प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2019
Total Views |


 


मुंबई : अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारित 'छपाक' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण लक्ष्मीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. या पहिल्या लूकमध्ये दीपिकाचा एक फोटो सर्वांना थक्क करून सोडणारा आहे.

 
 
 

लक्ष्मी अग्रवाल यांच्या भूमिकेसाठी दीपिकाच्या चेहऱ्यावर हुबेहुब बारकावे साकारण्यात आले आहेत. 'छपाक'च्या फर्स्ट लूकमध्ये ती हुबेहुब लक्ष्मी अग्रवाल यांच्यासारखी दिसत आहे. या चित्रपटात तिचे नाव 'मालती' असल्याचे या फोटोवरून समजते. तिच्या या लूकची बॉलिवूड कलाकारांनीही प्रशंसा केली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@