सागरी हल्ल्याबाबत प्रशिक्षण केंद्राची स्थापना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2019
Total Views |



पुणे : भारतात देशाच्या सुरक्षेसाठी अनेक प्रशिक्षण संघटना पुढे येत आहे. सागरी युद्धनौका, जहाजांवर शत्रूकडून आण्विक, जैविक किंवा रासायनिक हल्ला झाला, तर त्यापासून बचाव कसा करावा याचे प्रशिक्षण केंद्र नौदलासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. अशा प्रकारचे हे अशिया खंडातील पहिलेच प्रशिक्षण केंद्र आहे.

 

हे केंद्र लोणावळा येथील नौदलाच्या आयएनएस, शिवाजी युनिट येथे आहे. नौदल प्रमुख ॲडमिरल सुनिल लांबा यांच्या हस्ते या केंद्राचे उदघाटन सोमवारी झाले. या केंद्रात प्राथमिक ते अत्याधुनिक प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आण्विक, जैविक आणि रासायनिक हल्ल्यापासून संरक्षण, त्याचा शोध घेणे, मदत देणे यावर आधारित प्रशिक्षण या केंद्रात दिले जाणार आहे. या केंद्राद्वारे दोन दिवस ते सहा महिन्या पर्यंत कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी एक स्वतंत्र क्लासरूम आणि जहाजाची मोठी प्रतिकृतीही तयार करण्यात आली आहे.

 

यावेळी जर जहाजावर रासायनिक, जैविक अथवा आण्विक हल्ला झाला तर त्यावेळी जहाजातील यंत्रनेच्या मदतीने कसा बचाव करायचा याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. असा हल्ला झाल्यास जहाजातील डिक्टेटर यंत्रनेच्या साह्याने तो कोणता हल्ला आहे हे कळते. त्यावेळी जहाजातील आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करून सर्व दरवाजे लावले जातात. यामुळे बाहेरील हवा आत येत नाही. नंतर जहाजावरील पाण्याची शॉवर यंत्रणा सुरू करून आण्विक, जैविक स्फोटाचे अवशेष धुवून टाकले जातात.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@