गरीबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देणार : राहुल गांधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2019
Total Views |



नवी दिल्ली : देशातील २० टक्के गरीब कुटुंबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देण्याची घोषणा काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात केली आहे. काँग्रेस केंद्रीय समितीच्या बैठकीमध्ये निर्णय घेतल्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी ही घोषणा केली. या योजनेमुळे देशभरातील २५ कोटी कुटुंबांना याचा फायदा होईल, असा दावा त्यांनी केला.

 

लोकसभा निवडणुका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही आपल्या घोषणा पत्रातील महत्वाचा मुद्दा जनतेसमोर मांडला. मनरेगा योजनेनंतर किमान मूलभूत उत्पन्न हमी योजनेंतर्गत ही सर्वात मोठी योजना असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

 

देशभरातून गरीबी समुळ नष्ट करणे हे आमचे ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. निवडणूक जिंकल्यावर ही योजना लागू करू तसेच ही रक्कम थेट गरीब कुटुंबीयांच्या खात्यात जमा केली जाईल, असे ते म्हणाले. या योजनेचा २५ कोटी जनतेला लाभ होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर टीका केली. भाजप सरकार हे सर्वसामान्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@