मेक्सिकोचे ‘पिशाच्च’!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2019   
Total Views |



मराठीत काही ठिकाणी तिला 'ओसाडी' म्हणतात. या वनस्पतीला 'Mexican Devil’ म्हणण्याचं कारण ही मूळची मेक्सिको देशातली वनस्पती आज जगात अनेक देशांमध्ये बेसुमार फोफावून तिथल्या जैवविविधतेला घातक ठरत आहे. Asteraceae कुळातली ही वनस्पती मूळची मेक्सिकोची. हिरवी त्रिकोणी पानं आणि पांढरी फुलं येणारी ही वनस्पती एक ते दोन मीटर उंचीपर्यंत वाढते. याची मुळे पिवळसर असून त्यांना उग्र वास असतो. याची पांढरी फुलं दिसायला सुंदर असल्याने ही वनस्पती शोभेसाठी म्हणून अनेक देशांमध्ये नेऊन तिथल्या बागांमध्ये लावली गेली.

 

अनेक परदेशी वनस्पती कधीकाळी भारतात आल्या वा आणल्या गेल्या आणि इथल्या परिसरात आक्रमकपणे वाढल्या. भारताच्या जैवविविधतेला घातक ठरू लागल्या. एखादी वनस्पती जेव्हा तिच्या मूळ अधिवासापासून दूर वेगळ्या खंडात वा जैवभौगोलिक प्रदेशात नेऊन लावली जाते तेव्हा त्या प्रदेशात तिला कोणी नैसर्गिक भक्षक नसल्याने ती बेसुमार वाढण्याची शक्यता असते. International Union for Conservtion and Research (IUCN ) या संस्थेने 'Global Invasive Speceies Database' तयार केला आहे, ज्यात भारतात आढळलेल्या सुमारे २४७ आक्रमकपणे वाढणार्‍या परदेशी वनस्पतींची (Invasive Allien Species) नोंद केली गेली आहे. ‘काँग्रेस (Parthenium hysterophorus), ‘जलपर्णी’ (Water hyacinth), ‘पिवळा धोत्रा’ (Argemone Mexicana) ही त्यांची ठळक उदाहरणं. अशीच एक कधीकाळी परदेशातून भारतात आलेली आणि हिमालय, पश्चिम घाट आणि ईशान्य भारतातल्या जंगलांमध्ये आणि रानांमध्ये बेसुमार फोफावलेली वनस्पती म्हणजे 'Mexican Devil.'

 

'Mexican Devil' या वनस्पतीची शास्त्रीय नावं अनेक आहेत. मुख्यत Ageratina adenophora आणि Eupatorium Glandulosum या दोन नावांनी ही वनस्पती ओळखली जाते. मराठीत काही ठिकाणी तिला ’ओसाडी’ म्हणतात. या वनस्पतीला 'Mexican Devil.' म्हणण्याचं कारण ही मूळची मेक्सिको देशातली वनस्पती आज जगात अनेक देशांमध्ये बेसुमार फोफावून तिथल्या जैवविविधतेला घातक ठरत आहे. . Asteraceae कुळातली ही वनस्पती मूळची मेक्सिकोची. हिरवी त्रिकोणी पानं आणि पांढरी फुलं येणारी ही वनस्पती एक ते दोन मीटर उंचीपर्यंत वाढते. याची मुळे पिवळसर असून त्यांना उग्र वास असतो. याची पांढरी फुलं दिसायला सुंदर असल्याने ही वनस्पती शोभेसाठी म्हणून अनेक देशांमध्ये नेऊन तिथल्या बागांमध्ये लावली गेली. विसाव्या शतकात ही वनस्पती अमेरिका, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया अशा सर्व खंडांमध्ये पसरली आणि तिथल्या स्थानिक जैवविविधतेला धोका ठरू लागली.

 

जंगलं, नदीकिनारे, दलदलीचा प्रदेश, ओसाड जमिनी अशा कुठल्याही भूप्रदेशावर हे तण सहज वाढतं. कुठल्याही प्रकारच्या हवामानात आणि परिस्थितीमध्ये वाढण्याची क्षमता असल्याने याचं नैसर्गिकरीत्या नियंत्रण होत नाही. आशिया खंडात भारत, चीन, इंडोनेशिया, नेपाळ, फिलिपिन्स, श्रीलंका या देशांमध्ये हे तण पसरलं आहे. १९२० च्या दशकात न्यू साऊथ वेल्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, या देशांमध्ये या तणाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे अचानक घोडे मरून पडायला लागले. हे तण खाण्यात आल्याने घोड्यांना 'Numinbah Horse Sickness' नामक आजार होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

या वनस्पतीचं प्रजनन दोन प्रकारे होते. खोडालाच आडवी मुळं फुटून नवीन रोपं वाढतात आणि बियाही वार्‍याने वा पाण्यातून पसरून परिसरात रुजतात. त्यामुळेच या वनस्पतीचा प्रजननाचा वेग प्रचंड आहे. भारतात हिमालय, ईशान्य भारत आणि पश्चिम घाट प्रदेशात या परदेशी तणाने चांगलंच थैमान घातलं आहे. नेपाळमध्ये या तणाला ’बनमारा’ (वनाला मारणारं) म्हणतात. या वनस्पतीमध्ये विषारी द्रव्य असतात, जी परिसरातल्या इतर वनस्पतींना मारून टाकतात.

 

१९६० च्या दशकात कर्नाटकात कागद कारखाने उभे राहिले आणि कर्नाटकातल्या पश्चिम घाटाचा प्रदेश असलेल्या जंगलांतून हे कारखाने बांबू तोडून नेऊ लागले. बांबूची उपलब्धता आणि पुनरुत्पादनचा वेग याचा कसलाही विचार न करता कागद कारखाने बांबूची अनिर्बंध तोड करू लागले. याचा परिणाम असा झाला की, बांबूचे जंगल जसजसे कमी होऊ लागले तसतसे हे तण तिथल्या जंगलात वाढायला लागले. उन्हाळ्याच्या दिवसांत हे तण कोरडे होते आणि त्यामुळे जंगलांना वणवा लागण्याचा धोका वाढतो. चीनमध्ये बर्‍याच भागांत शेतात या तणाने हैदोस घातला आहे. गुरांना आणि रानात चरणार्‍या इतर प्राण्यांना हे तण त्रासदायक ठरत आहे. हिमालयीन प्रदेशातले चराई क्षेत्र या तणाने व्यापून टाकले आहे. गुरांना याचा दोन प्रकारे त्रास होतो. एक म्हणजे हे तण खाल्लं गेल्याने गुरं आजारी पडतात आणि गुरांच्या चरण्याच्या प्रदेशात हे तण वाढल्याने तिथे स्थानिक गवताच्या प्रजाती उगवत नाहीत.

 

 
 
 
 

एखाद्या देशात अन्य देशांतले घुसखोर प्रवेश करतात आणि त्यांना थोपवण्यासाठी त्या देशाला कडक कायदे करावे लागतात तसंच, 'Mexican Devil.' चा प्रादुर्भाव थोपवण्यासाठी अनेक देशांनी कायदे केले आहेत. ‘न्यू साऊथ वेल्स’ या देशाने एक कायदा करून 'Mexican Devil.' 'Class ४ Weed' असे संबोधले आहे आणि स्थानिक संस्थांकडून याच्या निर्मूलनाच्या उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. जैविक उपाययोजनांद्वारे या तणाचा नायनाट करण्याचे प्रयत्न भारतासह अनेक देशांमध्ये सुरू आहेत. 'Procecidochares utilis' नावाची एक माशी सर्वप्रथम आफ्रिकेत आणि नंतर आशियायी देशांमध्ये आणली गेली. ही माशी 'Mexican Devil.' तणाची पानं खाऊन टाकते. अनेक देशांमध्ये या माशीची व्यावसायिक तत्त्वावर पैदास केली जात आहे. 'Entyloma compositarum' नावाची एक बुरशीची प्रजाती या तणाची वाढ थांबवते असे संशोधकांना आढळून आले आहे. ओसाडीच्या बियाचं तेल काढतात. हे तेल त्वचारोगांवर औषधी मानलं जातं. मात्र, या तणाचं पर्यावरणदृष्ट्या उपद्रवमूल्यच जास्त असल्याने याचं निर्मूलन करण्याला पर्याय नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@