अब्दुल सत्तारांचा काँग्रेसला रामराम, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2019
Total Views |



मुंबई : काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री तसेच मराठवाड्यातील एक महत्वाचे नेते अब्दुल हेदेखील पक्षावर नाराज झाले आहेत. सत्तार हे औरंगाबाद मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते परंतु काँग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सत्तार यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेत पक्षाला रामराम ठोकला आहे. काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर सत्तार यांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हेदेखील यावेळी उपस्थित होते. यामुळे मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आपण सर्वांची मदत मागणार असल्याचे सांगत सत्तार यांनीही या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला.

अशोक चव्हाणांचे कोणीही ऐकत नाही!

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे काँग्रेसमध्ये कोणीही ऐकत नाही, त्यांचा शब्द दिल्लीतून फिरवला जातो असा आरोप करत जिथे प्रदेशाध्यक्षांचे कोणी ऐकत नाही, तिथे आमच्यासारख्यांचे काय, असा प्रश्न अब्दुल सत्तार यांनी रविवारी उपस्थित केला. आपली अशोक चव्हाणांवर नाराजी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@